Friday, May 3, 2024
Homeनगरभाजप -शिंदे स्थिर सरकार - खा. डॉ. विखे

भाजप -शिंदे स्थिर सरकार – खा. डॉ. विखे

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

भाजप व एकनाथ शिंदे यांचे राज्यातील सरकार हे स्थिर सरकार असून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बनल्याने ते भक्कम आहे. पुढील दहा वर्षे हे सरकार सत्तेवर राहील, असे प्रतिपादन नगर दक्षिण भाजपचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी आज कर्जत येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी कर्जतमधील भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

धाकटी पंढरी अशी ओळख असलेल्या कर्जत येथील ग्रामदैवत संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या रथयात्रेच्या निमित्ताने दर्शनासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील कर्जत येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विखे म्हणाले, शिवसेना कोणाची, पक्षचिन्ह या प्रश्नांची उत्तरे न्यायालय प्रविष्ठ बाबी असून याची उत्तरे लवकरच सर्वांना मिळतील.

परंतु याचा कोणताही परिणाम सरकारवर होणार नाही. तसेच लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन सर्व जिल्ह्यांना योग्य संधी मिळेल, असेही ते म्हणाले. यानंतर विखे हे रथ सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी याठिकाणी आलेल्या हजारो भाविकांनी वारकर्‍यांना यावेळी चहा व नाष्ट्याचे वाटप केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या