Friday, May 3, 2024
Homeराजकीयराहुरी तालुक्यात करोना महामारीत राष्ट्रवादीने काय दिवे लावले ?

राहुरी तालुक्यात करोना महामारीत राष्ट्रवादीने काय दिवे लावले ?

राहुरी |प्रतिनिधी|Rahuri

करोना काळात राहुरी तालुका व शहरात रुग्णांची हेळसांड झाली. याबाबत राष्ट्रवादीने काय दिवे लावले ?

- Advertisement -

याचे आधी आत्मपरीक्षण करावे, अशी टीका भाजपचे युवा शहराध्यक्ष गणेश खैरे यांनी केली आहे.

राहुरी येथील कोव्हीड सेंटर उभारणीत भाजपचे योगदान काय? अशी टीका राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष संतोष आघाव यांनी केली होती. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना खैरे यांनी जोरदार टीका करीत उत्तर दिले आहे.

राज्यात राष्ट्रवादी पक्ष सत्तेत असून ना.प्राजक्त तनपुरे हे राज्यमंत्री आहेत. परंतु करोनाच्या काळात रुग्णांचे हाल झाले. बेड न मिळणे, ऑक्सिजन सुविधा न मिळणे असे प्रकार वारंवार घडले. परंतु ना नेत्यांनी, ना कार्यकर्त्यांनी लक्ष घातले. खा. डॉ. सुजय विखे व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी लोकनेते रामदास धुमाळ महाविद्यालय येथे 100 बेडचे हॉस्पिटल सुरू केले.

त्यामुळे कृषी विद्यापीठ येथील कोव्हीड सेंटरवर नियंत्रण न ठेवू शकणारे ना.तनपुरे यांनी दिखाव्यासाठी बालाजी मंदिर येथे 70 बेडचे हॉस्पिटल सुरू केले आहे. परंतु त्याची अजूनही सुरुवात झाली नाही. फक्त उद्घाटन करण्याचीच घाई झाली होती. करोना काळात भाजपा नेते व कार्यकर्ते जनतेसोबत आहेत. राष्ट्रवादीने त्यांचे योगदान काय आहे? याची काळजी करू नये, असे खैरे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या