Saturday, September 14, 2024
Homeमुख्य बातम्याकसाबप्रमाणे राहुल गांधींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन्...

कसाबप्रमाणे राहुल गांधींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन्…

मुंबई | Mumbai

काँग्रेस नेते राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मानहानीप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुजरातच्या सुरतमधील जिल्हा न्यायालयाने गुरुवारी(२३ मार्च) राहुल गांधींना दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली.

- Advertisement -

त्यानंतर आज(शुक्रवार, २४ मार्च) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द करत असल्याचा निर्णय जाहीर केला. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपकडून राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. भाजपचे नेते नितेश राणे यांनीही राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केलीय.

३० प्रवाशांसह पुण्याला निघालेली खासगी बस पेटली, नगर-पुणे महामार्गावर अग्नितांडव

राहुल गांधी यांची केवळ खासदारकी काढून घेऊन थांबू नका, जसा अजमल कसाब वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला, तसा राहुल गांधी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून पाकिस्तान मध्ये हाकलून द्या, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

मोदी नावाचे सगळे चोर आहेत असे बोलायला आणि ओबीसी समाजाची बदनामी देशाची बदनामी करायला भाजपने सांगितले नव्हते. तसेच न्यायलायात गेलेला माणूस ही भाजपचा नव्हता. बदनामी राहुल गांधी यांनी करायची आणि आता कायद्याने काम केलं की भाजपच्या नावाने बोंबलायचं हा कुठला नियम? यापेक्षा राहुल गांधींना भाषण येत नसेल तर थोबाड बंद करायला सांगा, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली.

महापशुधन एक्सपोच्या मैदानात कृषीमंत्री सत्तारांची राजकिय फटकेबाजी

नितेश राणे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, आमची लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्याची मागणी आहे. सर्व सामान्यांना त्याची माहिती व्हावी यासाठी व्याख्यान व प्रबोधनाची मदत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण मुंब्र्याचा जित्तूदिन व अबू आझमी यांनी लव्ह जिहादची आकडेवारी खोटी असल्याचा असल्याचा आरोप करत आहेत.

हृदयद्रावक! रेल्वे रुळ ओलांडणं जीवावर बेतलं, पती पत्नीसह तीन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या