मुंबई | Mumbai
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. जरांगे यांनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमुळे भापज आणि शिवसेना शिंदे गटात आरोपसत्र सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर ही क्लिप कोणी फोडली असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. आता या प्रकरणावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी नवा दावा केला आहे. भाजपच्या विधान परिषदेतील एका आमदारानेच ही क्लिप बाहेर आणल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे या क्लिपमागे नेमके कोण आहे, ती सार्वजनिक करण्यामागचा हेतू काय आणि या प्रकरणातून कोणाला राजकीय फायदा मिळवायचा आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
गृहमंत्री म्हणून अपयशी
यावेळी संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य नेतृत्वार जोरदार टिका केली. मोदी-शहांचे देशावरचे नियंत्रण सुटले आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. ही टेप कुणी फोडली, हा प्रश्न अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्र्यांना पडला आहे. याचाच अर्थ तुमचेच स्टिंग ऑपरेशन झाले आहे आणि गृहखाते तुमच्याच विरोधात गेले आहे, असा दावा राऊतांनी केला.
महाराष्ट्रात पुढील तीन दिवसांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज; विदर्भ-मराठवाड्यात अलर्ट
म्हणजेच 500 कोटी रुपयांची चर्चा भाजपची आहे
यात तीन महत्त्वाचे पात्र आहेत. जरांगे पाटील मुख्य पात्र आहेत, दुसरे देवेंद्र फडणवीस आणि तिसरे एकनाथ शिंदे आहेत. बाकीचे सर्व एक्स्ट्रॉ कलाकार असून ते फडणवीस यांच्या थिएटरचे आहेत. तर शिंदे थिएटरचे एकही नाहीत. आपापसात बोलणारे भाजपचे आहेत. म्हणजेच 500 कोटी रुपयांची चर्चा भाजपची आहे, असा दावा राऊतांनी केला.
मग मुख्यमंत्री कोणाला वाचवत आहेत? ते स्वत:ला वाचवत आहेत का?
संजय राऊतांनी SIT संदर्भातही मोठे विधान केले आहे. SIT ची नाटकं मुख्यमंत्र्यांनी बंद करावीत. भाजपची कोअर टीम 500 कोटी रुपये दिल्या-घेतल्या संबंधी बोलते आहे मग मुख्यमंत्री कोणाला वाचवत आहेत? ते स्वत:ला वाचवत आहेत का? असे सवाल त्यांनी केले. तसेच 500 कोटी ही साधी रक्कम नाही. त्यामुळे या प्रकरणी आधी गुन्हा दाखल करायला हवा. ट
हे ड्युप्लिकेट चाणक्यांचे सरकार
राम मंदिर दानचोरी प्रकरणात आधी गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर एसआयटी स्थापन करून चंपतरायसारख्यांना सोडून दिले. त्यामुळे आधी गुन्हा दाखल करा. तसेच आतापर्यंतच्या एसआयटींच्या अहवालांचे काय झाले, असा सवालही त्यांनी केला. मुंढवा जमीन प्रकरणात सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना समन्स जात असतील तर मग 500 कोटीच्या व्यवहाराबाबत गुन्हा दाखल का होत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. चौकशी करणार म्हणजे नक्की काय करणार? फॉरेन्सिक गृहखात्याच्या अंडर आहे, निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी केली तर तेही मर्जीतील निवडणार असे सांगत हे हे बदमाशांचे सरकार आहे, हे ड्युप्लिकेट चाणक्यांचे सरकार आहे, हे लॉरेन्स बिष्णोईंचे सरकार आहे, अशी जोरदार टीका केली.




