Wednesday, November 6, 2024
Homeमुख्य बातम्याचित्रा वाघ यांचा उर्फीला इशारा; म्हणाल्या, रस्त्यावरील नंगानाच…

चित्रा वाघ यांचा उर्फीला इशारा; म्हणाल्या, रस्त्यावरील नंगानाच…

मुंबई | Mumbai

‘बिग बॉस फेम’उर्फी जावेद (Urfi Javed) परिधान करत असलेल्या तोकड्या कपड्यांच्या मुद्द्यावरून भाजपा (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) चांगल्याच आक्रमक झाल्या असून याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या….

- Advertisement -

यावेळी त्या म्हणाल्या की, मुंबईमधील भर रस्त्यात सार्वजनिक ठिकाणी उर्फी नावाची एक महिला नंगा नाच करत आहे. एक महिला मला सतत मेसेज करत होती मला बोलायचे आहे. एक दिवस मला त्या महिलेने एक व्हिडिओ पाठवला. एक मुलगी अंगावर नगण्य कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी आपल्या शरीराचे प्रदर्शन करताना दिसली. ज्या महिलेने मला व्हिडिओ पाठवला तिच्याशी बोलले तेव्हा त्या म्हणाल्या माझी मुलगी याला बळी पडली आहे. त्यामुळे मी भूमिका घेतली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) महराष्ट्रात असा नंगा नाच चालू देणार नाही, असा इशारा चित्रा वाघ यांनी उर्फीला दिला आहे.

पुढे वाघ म्हणाल्या की, राज्य महिला आयोगाचे (State Commission for Women) काम महिलांचा सन्मान जपणं, मान राखणं आहे. मग, उघड्या, नागड्या फिरणाऱ्यांना आयोगाला जाब विचारु वाटला नाही. कारण, त्यांना वेळ वाया घालवायचा नाही. मग, वेळ कशासाठी घालवायचा आहे. एखादी महिला मुंबईत उघडी-नागडी फिरत आहे. समाजमाध्यमांत अश्लील, घाणेरडे व्हिडीओ व्हायरल होत असताना सुमोटो दाखल करुन कारवाई का केली नाही. यासाठी महिला आयोगाला वेळ नसेल तर, मग त्या पदावर बसण्याचा कोणाला अधिकार नाही, असे म्हणत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर चित्रा वाघ यांनी टीका केली आहे.

तसेच ट्वीटरवर आलेल्या बातमीची दखल घेऊन महिला आयोगाने वेब सिरीजच्या पोस्टर्सवर अंग प्रदर्शन करतात म्हणून वेब सिरीज, दिग्दर्शक व अभिनेत्रीला नोटीस (Notice) पाठवली होती. या पोस्टरमुळे अंगप्रदर्शन व धुम्रपान संदर्भात उमटत असलेल्या प्रतिक्रियांमुळे नोटीस ट्विटरची दखल घेणारे महिला आयोग असा नंगानाच कसा सहन करते? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या