Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशमोदींच्या पुतणीला भाजपने नगरसेवकाचे तिकीट नाकारले, कारण….

मोदींच्या पुतणीला भाजपने नगरसेवकाचे तिकीट नाकारले, कारण….

अहमदाबाद :

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुतणी सोनल मोदी यांना भाजपाने अहमदाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी तिकीट नाकारले आहे. गुजरात भाजपाने महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत सोनल मोदी यांचे नाव नाही.

- Advertisement -

सोनल मोदी यांनी अहमदाबादच्या बोदकदेव वॉर्डातून भाजपाकडे तिकीट मागितले होते. काल भाजपाने उमेदवारांची घोषणा केली. पण त्यात सोनल मोदी यांचे नाव नव्हते. याबाबत भाजपाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील म्हणालेत, सर्वांसाठी नियम सारखे आहेत. नेत्यांच्या नातलगांना तिकीट द्यायचे नाही असा पक्षाचा निर्णय झाला आहे. त्यानुसारच मोदींच्या पुतणीला तिकीट नाकारले.

काय म्हणाल्या सोनल मोदी

मला पक्षाने तिकीट नाकारले तरी मी एक समर्पित कार्यकर्ता म्हणून पक्षात काम करीत राहीन, असे सोनल मोदी यांनी स्पष्ट केले आहे. सोनल मोदी या नरेंद्र मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी यांची कन्या आहेत. प्रल्हाद मोदी यांचे किराणा मालाचे दुकान असून ते गुजरात फेअर प्राइस शॉप असोसिएशनचे अध्यक्षही आहेत.

कधी होणार निवडणूक

गुजरातमध्ये ६ महापालिकांची निवडणूक घोषित झाली आहे. यात अहमदाबाद, सुरत, बडोदा, भावनगर, जामनगर अशा मोठ्या महापालिकांचा समावेश आहे. २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. ८१ नगरपालिका, ३१ झेडपी आणि २३१ पंचायत समितींसाठी २८ फेब्रुवारीला मतदान होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या