Friday, May 3, 2024
Homeनगरकोपरगांव शहरवासियांना आम्ही पाणी देणारे आहोत नेणारे नाही

कोपरगांव शहरवासियांना आम्ही पाणी देणारे आहोत नेणारे नाही

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने विरोधकांनी आपल्याला हिणवलं. जाणूनबुजून त्रास दिला. नको ते किळसवाणे आरोप ( Allegations) केले. पण माजीमंत्री शंकरराव कोल्हे ( Former Minister Shankarrao Kolhe) यांचा विकासाचा वारसा, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे (Bipin Kolhe) यांची खंबीर साथ आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व त्यांचे सहकारी आपल्या पाठीशी असल्यानेच त्यांच्या माध्यमांतून कोपरगांवच्या (Kopargav) इतिहासात सर्वाधिक 30 ते 50 कोटी रूपयांचा विकास निधी आणून कामे मार्गी लावली.

- Advertisement -

शुध्द पिण्यांच्या पाण्याची योजना (Pure Srinking Water Scheme) मंजुर करून आणली पण पाण्यांच्या प्रश्नांवर चुकीचे आरोप लावले जातात. तो गोबेल्स तंत्राचा भाग असून शहरवासियांवर ज्या ज्या वेळी संकटे आली त्या त्या वेळी सर्वप्रथम संजीवनी उद्योग समुहच (Sanjeevani Udyog Group) धावून आलेला आहे. शहरवासियांना आम्ही पाणी देणारे आहोत नेणारे नाही अशा शब्दात भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे (BJP state secretary Snehalta Kolhe) यांनी लोकप्रतिनिधी व विरोधकांच्या आजवरच्या टीकेचा (Criticism) समाचार घेतला.

पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. प्रारंभी भाजपा संपर्क कार्यालयात भारतरत्न वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पुजन करून आदरांजली वाहण्यांत आली. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, भाजपा गटनेते रविंद्र पाठक, राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, स्वप्नील निखाडे, बाळासाहेब नरोडे, महावीर दगडे, सर्व महिला नगरसेविका-नगरसेवक, बबलू वाणी, विनोद राक्षे यांच्यासह विविध संस्थाचे आजी माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक आदि उपस्थित होते.

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, कोपरगांव शहराचा असो अगर मतदार संघाच्या शेतीच्या पाण्यांचा प्रश्न असो त्यात आपण कधीही राजकारण आणलेले नाही. राजकीय जोडे बाजुला ठेवुन पिण्यांच्या पाण्यांचे काम व्हावे याच भावनेने 260 कोटी रूपये खर्चाची निळवंडे शिर्डी कोपरगांव पाणी योजना मंजुर करून आणली. पण विधानसभेच्या निवडणुकीच्या निमीत्ताने यात सध्याचे लोकप्रतिनिर्धीनी राजकारण आणून यातील असंतुष्ट आत्म्यांना पडद्यामागुन साथ देत निळवंडे शिर्डी कोपरगांव पाणी योजना न्यायालयाच्या माध्यमांतुन हाणून पाडली. आणि शहरवासियांना स्वच्छ शुध्द पिण्यांच्या पाण्यांच्या योजनेपासून वंचित ठेवण्यांचे पाप केले आहे.

शहर पोलिस ठाणे, गोकुळनगरी पुल, बाजारओटे, बसस्थानक, वाचनालय, अग्नीशमन केंद्र, बंदिस्त नाटयगृह, विशेष रस्ता अनुदानातुन मुख्य रस्त्यांची कामे, त्रिशंकु भाग पालिका हददीत समाविष्ठ करणे, लक्ष्मीनगर अतिक्रमीत जागा त्यांच्या नावावर सातबारे करणे आदि कामासाठी 30 ते 50 कोटींचा निधी आणला. यातील बहुतांष कामे पुर्णही झाली पण त्यात सध्याचे लोकप्रतिनिधी राजकारण आणून शहरवासियांना वेठीस धरत आहेत. आपण एक महिला लोकप्रतिनिधी त्याचबरोबर पालिका मुख्याधिकारी शिल्पा दरेकर या देखील महिला त्या उत्तम काम करतात म्हणून त्यांनाच लक्ष्य केले.

वाटटेल तो त्रास दिला. आपल्याकडे पद असो वा नसो पण शहरवासियांना पिण्यांचे पाण्यांसाठी आपल्या डोळयात नेहमीच पाणी येते. हा प्रश्न सुटला पाहिजे हीच तळमळ कोल्हे कुटूंबामध्ये आजही कायम आहे. आपल्यामुळे साईबाबांच्या शिर्डीला पाणी आले नाही ही मनांत सल आहे, साईबाबा सर्वांना सुबुध्दी देवो असे त्या म्हणाल्या.

निळवंडे शेतीचे पाणी कमी होवुन कोपरगांवशहरवासियांना ते मिळावे असा दुजाभाव आपल्यामध्ये कधीही नव्हता. उलट निळवंडेचे कालवे पुर्ती होवुन शेती सिंचीत व्हावी आणि कुठलाही वाद उपस्थित न होता शहरवासियांची कायमस्वरूपी पिण्यांच्या पाण्यांची तहानही भागली पाहिजे याच विचारावर आपण आजही ठाम आहोत.

– स्नेहलता कोल्हे

- Advertisment -

ताज्या बातम्या