अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगरपालिका निवडणुकीत भाजपने प्रभावी कामगिरी केलेली आहे. महानगर पालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात फिरतांना भाजपसाठी चांगली परिस्थिती दिसत आहे. यामुळे या निवडणुकीत भाजपच राज्यात एकनंबरचा पक्ष ठरणार असल्याचा विश्वास भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. शनिवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माजी खासदार डॉ.सुजय विखे, आ. संग्राम जगताप, आ. मोनिकाताई राजळे आदी सोबत होते.
बदलापूर येथील अत्याचार प्रकरणात सहआरोपी असणार्या व्यक्तीला भाजपने स्वीकृत नगरसेवक केले या विषयावर मला काहीही माहीती नाही. या विषयावर माहिती घेवून बोलेल असे सांगत राज्यातील जनतेने गोपिनाथ मुंडे यांच्यावर अतोनात प्रेम केले असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितले. ठाकरे बंधू यांच्यासह पवार बंधू आणि सुप्रिया सुळे यांच्या एकत्र येण्यावर थेट बोलणे मुंडे यांनी यावेळी टाळले.




