Friday, May 3, 2024
Homeजळगावआगामी लोकसभा निवडणुकीत भाजप 325 जागांवर विजयी होणार

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप 325 जागांवर विजयी होणार

जळगाव । jalgaon प्रतिनिधी

पक्षाला अनुकूल परिस्थिती असल्याने सर्वांनी हुरळून न जाता सजग राहिले पाहिजे. भारत विसाव्या शतकात विश्व गुरू बनेल असे भाकीत करण्यात आले होते. हे भाकीत चार पाच वर्षांतच पुर्ण होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 325 जागांवर विजयी होईल. तर महाराष्ट्रात भाजपचे 45 ते 47 खासदार निवडून येतील,असा विश्वास ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

रविवारी ब्राह्मणसभेत भाजपाच्या बूथ सशक्तीकरण अभियानाच्या बैठकीत ना.महाजन बोलत होते. व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, आमदार संजय सावकारे, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार स्मिता वाघ, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी,प्रदेश चिटणीस अजय भोळे, जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, नगरसेवक विशाल त्रिपाठी, जिल्हा सरचिटणीस डॉ.राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे यांच्यासह जळगाव जिल्हा ग्रामीण व महानगरचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ना.गिरीश महाजन पुढे म्हणाले की,कार्यकर्त्यांनी संघटन मजबूत करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. पक्ष संघटना बळकट करून राज्यस्तरावर जळगाव जिल्हा एक नंबरवर नेण्यासाठी परिश्रम घ्या, असे सांगून ना.गिरीश महाजन पुढे म्हणाले की, मतदार भारतीय जनता पक्षाला मतदानासाठी तयार आहेत. आता कार्यकर्त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहचण्याची गरज आहे. सर्वांनी पक्ष संघटन वाढीसाठी वेळ द्यावा लागेल याची जाणीव त्यांनी यावेळी करून दिली. महायुती शासन विविध लोककल्याण राबवित आहे. या योजनांची माहिती घराघरांपर्यंत पोहचवा. पक्षाची भूमिका, ध्येयधारेणे, कामे लोकांपर्यंत कशी पोहचतील, यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. बूथ सशक्त करून जळगाव जिल्हा राज्यात एक नंबरवर आणा. पक्षासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबाबत ना.महाजन यांनी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगतमान्य नेता आहेत. जगात त्यांना मान सन्मान मिळत आहे. माझा देश पुढे कसा जाईल याकरिता काम करा. आपले कतृत्व सिध्द करा, पदाची अपेक्षा न ठेवता काम केल्यास पक्ष न्याय देतो, असेही त्यांनी सांगितले.

मी मी म्हणणार्‍यांची राख रांगोळी

भाजपने नेहमीच कार्यकर्त्यांना संधी दिली. मात्र, काही हे सर्व माझ्यामुळे घडत आहे, अशी काही जण शेखी मिरवित असतात, असल्याची टीका त्यांनी नाव न घेता आ. खडसे यांच्यावर केली. मी मी म्हणणार्‍यांची राखरांगोळी झाली आहे. आम्ही पक्षाच्या पुण्याईने व कार्यकर्त्यांच्या मेहनतीने आमदार, मंत्री झालो. जर मी माझ्यामुळे सगळे आहे असे म्हणू लागलो तर राखरांगोळी होण्यास वेळ लागणार नाही,असा टोलाही त्यांनी लगावला.

कार्यकर्त्यांनो, जोमाने कामाला लागा-डॉ.गावित

भाजपची वन बुथ टेन युथ संकल्पना होती. ही योजना खूप वर्षांपासून राबविण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. त्यानुसार कार्यकर्त्यांनो, जोमाने कामाला लागा,असे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ.विजय कुमार गावित यांनी केले. ते पुढे म्हणाले की, दोन पक्षाचे सरकार असल्याने काही अडचणी येत आहेत. परंतु, आपण समजूतदारपणे लक्षात घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. हे जर आपण लक्ष देऊन पुढे गेलो तर मला वाटतं की, आपण त्यातून मार्ग काढू. संयम बाळगला तर आपणास निश्चितपणे यश मिळेल. राज्यशासनाने शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. यामाध्यमातून प्रत्येक जिल्हा 75 हजार लाभार्थ्यांना लाभ द्यावयाचा आहे. हे साधारणपणे 15 जूनपर्यंत आपल्याला करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारला 9 वर्ष पूर्ण होत असल्याने केंद्राच्या योजना देखील जनतेपर्यंत पोहचवयाच्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या