मुंबई । Mumbai
मुंबई महापालिकेचा २०२५-२०२६ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज, ४ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला. मुंबई महापालिकेचा हा अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सादर केले.
मुंबई महानगरपालिकेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षातील ७४४२७.४१ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे सादर केला. चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत आगामी अर्थसंकल्पाचे आकारमान ९२४६.६२ कोटी रुपयांनी अधिक असून आगामी अर्थसंकल्प १४.१९ टक्क्यांनी अधिक आहे. विविध विकास कामांसाठी ४३१६५.२३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झोपडपट्टीतील गाळेधारकांना मुंबई महापालिका कर भरावा लागणार आहे. झोपडपट्टीतील गाळेधारकांकडून सुमारे ३५० कोटी इतका महसूल अपेक्षित आहे. मुंबई महापालिकेत अडीच लाख झोपडपट्ट्या, त्यातील २० टक्के झोपडपट्ट्यांमध्ये उद्योगधंदे दुकाने गोदाम हॉटेल्स अशा व्यवसायिक कारणासाठी वापर करण्यात आलाय. या व्यवसायिक गाळेधारकांना कर निर्धारण करून मालमत्ता मुंबई महापालिका कर वसूल करणार आहे. यातून सुमारे ३५० कोटी इतका महसूल प्राप्त होणे अपेक्षित आहे.
मुंबईसाठी विशेष वातावरणीय बजेट सादर करण्यात आले. पर्यावरण खात्याकरता ११३ कोटींची तरतूद करण्यात आली. मुंबई पर्यटनवाढीसाठी महापालिकेच्या नव्या योजनाही आखल्या आहेत. राणी बागेचं नवं आकर्षण म्हणून राणी बागेत पेंग्वीन, वाघानंतर जिराफ, झेब्रा, पांढरा सिंह, जॅग्वार या विदेशी प्रजातीचे प्राणी आणले जाणार आहेत. मुंबई शहरातील कोळीवाड्यांच्या विकासासाठी २५ कोटी देण्यात येणार आहेत. संजय गांधी नॅशनल पार्कच्या जमिनीखालील बोगद्यात वाघाचे शिल्प उभारले जाणार आहेत. लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय उभारले जाणार आहेत. काळा घोडा आणि रिगल जंक्शन परिसराचा विरास केला जाणार आहे.
अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे…
मुंबईतील रस्त्यांचे जाळे ; फुटपाथ यांकरता ५१०० कोटींची तरतुद
कोस्टल रोड करता १५०७ कोटींची तरतुद
कोस्टल रोड -२ या पश्चिम उपनगराला जोडणा-या दहिसर ते भाईंदर या किनारी रस्त्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी ४३०० कोटींची तरतुद
गोरेगांव मुलुंड लिंक रोडकरता १९५८ कोटींची तरतूद
कचरा गोळा करण्यासाठी पालिकेकडून कर लागु केला जाणार, तूर्तास कर नाही यासाठी कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेणार.
बेस्ट उपक्रमासाठी १००० कोटींची तरतूद अनुदान म्हणून देण्यात येणार.
आरोग्य विषयक सोयीसुविधांसाठी ७००० कोटींची तरतूद
शिक्षण सुविधांसाठी ४००० कोटींची तरतूद.
मुंबईतल्या महापालिका शाळांची स्थिती सुधारण्याकरता दोन महत्वाच्या मोहिमा. मिशन २७ आणि मिशन संपूर्ण हे दोन मिशन पालिकेच्य़ा शाळांकरता राबवले जाणार
मुंबईसाठी विशेष वातावरणीय बजेट सादर, पर्यावरण खात्याकरता ११३कोटींची तरतुद.