Monday, June 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील चार आरोपींची निर्दोष मुक्तता

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील चार आरोपींची निर्दोष मुक्तता

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

मालेगाव येथे 8 सप्टेंबर 2006 रोजी मशिदीजवळ सायकल बॉम्बद्वारे साखळी स्फोट होऊन अनेकांचा मृत्यू व शेकडो जखमी झाले. सुरुवातीला एटीएसने सिमीशी संबंधित काही मुस्लिम तरुणांना अटक केली, पण नंतर तपास एनआयएकडे गेल्यानंतर स्वामी असिमानंदच्या कबुलीजबाबावरून हिंदुत्ववादी संघटनांवर संशय घेत चार जणांना 2013 मध्ये अटक करण्यात आली होती.

2025 मध्ये विशेष एनआयए न्यायालयाने त्यांच्यावर आरोप निश्चित केले, मात्र आरोपींनी हा निर्णय उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने तपासातील त्रुटी दाखवत आरोपनिश्चितीची प्रक्रिया अवैध ठरवली आणि चारही आरोपींना निर्दोष मुक्त केले.

न्यायालयाने नमूद केले की, ठोस पुरावे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि विश्वासार्ह ओळख परेड नसल्याने आरोपींचा सहभाग सिद्ध होत नाही.

ताज्या बातम्या

Jalgaon MLC Election : जळगाव विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे महाजन विजयी; मविआच्या...

0
जळगाव | प्रतिनिधी | Jalgaon विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून अपेक्षेप्रमाणे महायुतीचे (Mahayuti) नंदकिशोर महाजन (Nandkishor Mahajan) मोठया मतधिक्याने विजयी झाले आहे. महाजन...