Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBMC Elections: ऐन निवडणुकीच्या रणसंग्रामत मनसेला मोठं खिंडार, ११ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; "१९...

BMC Elections: ऐन निवडणुकीच्या रणसंग्रामत मनसेला मोठं खिंडार, ११ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; “१९ वर्षे ९ महिन्याच्या राजकीय प्रवासाला…”

मुंबई | Mumbai
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबईत मोठा राजकीय धक्का बसला आहे. मनसेच्या मुंबईतील ११ प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकाचवेळी आपल्या पदांचा राजीनामा दिल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक 97 आणि 98 मध्ये मनसेच्या ११ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. वांद्रेतील प्रभाग 97 हा ठाकरेंच्या उमेदवाराला गेल्याने, तर प्रभाग 98 मधील मनसेचा उमेदवार मान्य नसल्याने ११ पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

राजीनामे दिलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये विभागीय व शहरस्तरीय जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या नेत्यांचा समावेश असून, यामुळे मुंबईतील मनसेची संघटनात्मक ताकद कमकुवत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १९ वर्ष ९ महीने मनसे सोबत असलेल्या मनसे सैनिकांनी पक्षाची साथ सोडली आहे. मनसेच्या स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या या सैनिकांनी अचानक राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ या नाराजीवर काय तोडगा काढतात. त्यांची मनधरणी करतात का, याविषयीची चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

Nashik NMC Election: पहिल्याच दिवशी ‘इतके’ उमेदवार रिंगणाबाहेर, माघारीला उरले काही तास ; बंडोबांना थंडोबा करण्याचे नेत्यांसमोर मोठे आव्हान

YouTube video player

नेमका वाद काय?
वांद्रे येथील प्रभाग क्रमांक ९७ आणि ९८ मध्ये उमेदवारी वाटपावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. इथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे (UBT) उमेदवार बाळा चव्हाण हे ‘मशाल’ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तर दुसरीकडे, मनसेच्या वतीने दिप्ती काते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इथे ठाकरे बंधुची युती झाली असली तरी याच प्रभागामधून मनसेकडून इच्छुक असणाऱ्या निष्ठावंताना डावलल्याची भावना आहे. यातूनच अनेक वर्षे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत.

मनसैनिकांनी एक पत्र पाठवत सामूहिक राजीनामे सादर केले आहेत. राज ठाकरे यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात संबंधित पदाधिकाऱ्यांनी ९ मार्च २००६ ते ३१ डिसेंबर २०२५ अशा १९ वर्षे ९ महिन्याच्या अविस्मरणीय राजकीय प्रवासाला अखेरचा जय महाराष्ट्र… अशी एकच ओळ लिहिली आहे. ९ मार्च २००६ रोजी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. तेव्हापासून आपण सोबत होतो, तरीही डावलण्यात आलं, असा संदेश देण्याचा प्रयत्न या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

दरम्यान, पक्ष नेतृत्वाकडून परिस्थिती सावरण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचे समजते. वरिष्ठ नेत्यांकडून राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असून, लवकरच अधिकृत भूमिका जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : कट चहा ५, कॉफी १२ तर मिसळपाव ‘इतक्या’...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणूक (Nashik Municipal Corporation) २०२६ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने स्थानिक प्रचलित दरांची यादी...