Wednesday, January 7, 2026
Homeनगरतत्कालीन तपासी अधिकार्‍याला नोटीस; शेअर मार्केट फसवणूक प्रकरण

तत्कालीन तपासी अधिकार्‍याला नोटीस; शेअर मार्केट फसवणूक प्रकरण

बोधेगाव |प्रतिनिधी| Bodhegav

शेअर मार्केट फसवणूक प्रकरणी अटक असलेल्या साईनाथ कल्याण कवडे यांच्या अ‍ॅसिटेक सोल्युशन कंपनीबाबतचा तपास सदोष करणे, आरोपींना अटक न करणे, साक्षीदारांच्या जबाबांवर स्वाक्षरी न करणे, योग्य प्रक्रियेचे पालन न करणे व आवश्यक पुरावे गोळा न करणे, पुरावे असूनही आरोपींना अटक न करणे, तपासात निष्काळजीपणा, आरोपींना मदत होईल असे दोषारोपपत्र तयार करणे यांसारख्या अनेक चुका केल्याचे आरोप पोलिसांवर करणार्‍या याचिकेवर म्हणणे मांडण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शेवगावच्या तत्कालीन पोलिस अधिकार्‍यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे.

- Advertisement -

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या साईनाथ कवडे याला पोलिसांकडून व तपासी यंत्रणेकडून वाचविण्याचा प्रयत्न होत असून, या गुन्ह्याचा तपास सीबीआय व विशेष तपास यंत्रणा विभागाकडे सोपविण्याची मागणी करणारी याचिका यातील मूळ फिर्यादी अवधूत विनायक केदार (रा. शेवगाव) यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. त्यावर सुनावणी घेताना तत्कालीन पोलिस अधिकारी व शासकीय यंत्रणा यांना आपापले म्हणणे मांडण्याचे आदेश न्या. श्रीमती विभा कंकणवाडी व न्या. हितेन वेणेगावकर यांनी दिले.

YouTube video player

रावताळे- कुरूडगाव (ता. शेवगाव) येथील साईनाथ कवडे याच्या विरोधात 330 जणांनी आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल केलेले आहेत. या फसवणुकीचा आवाका लक्षात घेता शेवगाव पोलिसांनी त्यास सात महिन्यांपूर्वी अटक केलेली आहे. मात्र, याबाबत सुरू असलेल्या खटल्यामध्ये पोलिस व तपासी यंत्रणेकडून आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे. आरोपीने गुंतवणूकदारांच्या पैशातून खरेदी केलेली मालमत्ता त्याचे कुटुंबातील फरार आरोपी आई-वडील, भाऊ, साईनाथ याची पत्नी, भावजय हे परस्पर विल्हेवाट लावत आहेत, पुरावे नष्ट करत आहेत, त्यामुळे त्यांनाही तातडीने अटक करावी, मात्र, अकरा महिन्यांपासून गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना ते सापडत नाहीत, त्यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयात प्रलंबित असताना त्यांना अटकेपासून वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न होत आहे.

अ‍ॅसिटेक सोल्युशन कार्यालयातील कर्मचार्‍यांचा या गुन्ह्यात सहभाग असतानासुद्धा त्यांची चौकशीदेखील झालेली नाही. आरोपीने शेवगाव येथील सराफ व्यावसायिकाकडून 20 किलोपेक्षा अधिक सोने खरेदी केलेले असताना त्या व्यावसायिकाची साक्ष नोंदविण्यात आलेली नाही व आरोपींचे बँक लॉकर सील करण्यात आलेले नाही, असे अनेक आरोप या याचिकेत करण्यात आले आहेत. याचिकाकर्ता अवधूत विनायक केदार यांच्या वतीने अ‍ॅड. अनंत देवकाते काम पाहत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...