Friday, May 3, 2024
Homeनगरबोल्हेगाव, नागापूर परिसरात पोलीस गस्ती वाढवा

बोल्हेगाव, नागापूर परिसरात पोलीस गस्ती वाढवा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बोल्हेगाव, नागापूर परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत चालली आहे. रोडरोमिओंकडून महिला व युवतींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे.

- Advertisement -

महिलांना कामानिमित्त घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. गळ्यातील मंगळसूत्र चोरीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. चोरांवर व रोडरोमिओंवर वचक बसण्यासाठी बोल्हेगाव परिसरामध्ये पोलिस चौकी सुरू करून गस्त वाढवावी, अशी मागणी नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्याकडे केली आहे. वाकळे यांनी याबाबतचे निवेदन निरीक्षक गायकवाड यांना दिले आहे. यावेळी नागरिक उपस्थित होते.

बोल्हेगाव परिसरामध्ये दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणात लोकवस्तीत वाढ होत आहे. जवळच औद्योगिक वसाहत असल्यामुळे कामगार वर्गही मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत आहेत. या ठिकाणी परप्रांतिय व अनोळखी व्यक्ती तसेच समाज कंटकाचे प्रमाण वाढले आहे. गेल्या महिनाभरापासून चोरांनी शहर परिसरामध्ये धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिकांना चोरांपासून सुटका मिळावी, यासाठी पोलिसांनी चोरांचा बंदोबस्त करावा. यासाठी गस्त वाढविण्याची आवश्यकता आहे. पोलिसांनी कणखर भूमिका घेऊन चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाकळे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या