Wednesday, January 15, 2025
Homeदेश विदेशBomb Threat E-mail: ताज महाल बॉम्बने उडवून देवू; धमकीचा ई-मेल आल्याने एकच...

Bomb Threat E-mail: ताज महाल बॉम्बने उडवून देवू; धमकीचा ई-मेल आल्याने एकच खळबळ, परिसरातील सुरक्षेत वाढ

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जगप्रसिध्द आग्र्यातील ताजमहालाला बॉम्बने उडवून देवू, असा धमकीचा ई-मेल मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या ईमेल नंतर सुरक्षा यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहचली आहे. आता ताजमहलच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे. बॉम्ब निकामी पथक ताजमहल परिसरात दाखल झाले असून आग्रा पोलिस सध्या मेल कुठून आला याचा तपास करत आहेत.

एसीपी ताज सिक्योरिटी सईद अरीब अहमद यांनी पीटीआयला माहिती देताना यासंदर्भात सांगितले की, पर्यटन विभागाला एक ईमेल आला होता. त्या आधारे ताजगंज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताज महलाची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत कडेकोट करण्‍यात आली आहे. त्‍याचबरोबर बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकेही दाखल झाले. या तपासणीदरम्यान पर्यटकांमध्ये कोणतीही दहशत निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. परिसरात तपासणी केली जात आहे. कोणत्‍याही प्रकारची संशयास्‍पद वस्‍तू आढळलेली नाही, असेही पोलिसांनी स्‍पष्‍ट केले आहे.

- Advertisement -

दुसरीकडे, उत्तर प्रदेश पर्यटन उपसंचालक दीप्ती वत्स यांनी सांगितले की, संशयास्पद ईमेल आग्रा पोलिसांना पाठवण्यात आला आहे, त्या आधारावर एफआयआर देखील नोंदवण्यात आला आहे. तसेच, आता ताजमहालाला अशा धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही, फसव्या धमक्या देणारे काही घटक असे प्रकार करत राहतात. आता ही धमकी कोणी पाठवली, याचा तपास सुरू आहे, असेही दीप्ती वत्स यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या