Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रST Strike : उच्च न्यायालयाचा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अल्टिमेट

ST Strike : उच्च न्यायालयाचा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अल्टिमेट

मुंबई | Mumbai

मागील अनेक दिवसांपासून राज्यातील एसटी कामगारांचा संप (ST Workers Strike) सुरू आहे. एसटी महामंडळाचे (MSRTC) राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून एसटी कामगार चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -

काही कर्मचारी कामावर दाखल देखील झाले आहेत. तर उर्वरित कामगार अद्याप कामावर रूजु झाले नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या (MSRTC Strike) सुरू असलेल्या संपावर मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी १५ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे. मात्र, तोपर्यंत कामावर रुजू न होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळ कारवाई करू शकते, असं न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं आहे. तसेच सरकारचा निर्णय धोरणात्मक असल्याचं निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवलंय.

न्यायालयाच्या या निर्णयाने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात असून आता पुढील १० दिवसांत कामावर हजर न झाल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या