Thursday, July 23, 2026
HomeनगरRahuri : आगीत ब्राह्मणीतील 60 एकर ऊस खाक

Rahuri : आगीत ब्राह्मणीतील 60 एकर ऊस खाक

उंबरे |वार्ताहर| Unbare

ब्राह्मणी केंदळ रस्त्याला ब्राह्मणीच्या शेतकर्‍यांच्या साठ एकर ऊस जळून खाक झाला असल्यामुळे शेतकर्‍याच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ही आग शॉर्टसर्किटने लागली असल्याची चर्चा सध्या शेतकर्‍यांमध्ये सुरू आहे. ब्राह्मणी येथील बारा शेतकर्‍यांतील ब्राह्मणी केंदळ रस्त्याला काल सोमवारी ऐन उन्हात बारा वाजता उशाला आग लागल्यामुळे तब्बल तीन तास ही आग सुरू होती. यामध्ये साठ एकर ऊस जळून खाक झाला आहे.

- Advertisement -

मिळालेली माहितीनुसार ब्राह्मणी येथील विजय गायकवाड, भानुदास गायकवाड, साहेबराव गायकवाड, किशोर खोसे, भाऊसाहेब हराळे, सुरेश हराळे, सुदाम राजदेव, सर्जेराव हापसे, सुजाता कोरके, संभा हापसे, संदीप बल्लाळ, ठकसेन बानकर या शेतकर्‍यांचे 60 एकर जळून खाक झाला. सकाळी बारा वाजता ही आग लागली होती त्यावेळी अग्निशामक दल आले पण ते उसापर्यंत पोहोचू न शकल्यामुळे ही आग तीन तास मोठ्या वेगाने सुरू होती. खरं तर आता कारखाना सुरू होईल काहींचे ऊस तोडणीसाठी आले होते. अशातच या शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचे शेतकर्‍यांमध्ये चर्चा सुरू होते.

सध्या शेतकर्‍यांचे पिके पूर्णपणे पावसाने संपुष्टात आली आहेत. या संकटामुुळे शेतकर्‍यांना दीपावली करणे मुश्किल आहे. बाजारपेठेत कुठेही गर्दी नाही. शेतकर्‍यांना पैसा नसल्यामुळे बाजारपेठही सुन्न झाले आहेत असे असताना शेतकर्‍यांना कारखाना सुरू या अशा होती कारखाना सुरू झाल्यानंतर आपला ऊस जाईल दोन रुपये मिळतील याची बेरीज करून शेतकरी होता परंतु त्या 60 एकर उजळून खाक झाले. शासनाने ताबडतोब या शेतकर्‍यांना भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

ताज्या बातम्या

नाशिक रिंगरोड प्रकरणी उच्चस्तरीय समिती गठीत

0
मुंबई | उद्धव ढगे पाटील Mumbai नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या बदललेल्या संरेखनाची (अलाइनमेंट) तसेच रिंग रोडमध्ये झालेल्या जमीन खरेदी...