Sunday, May 5, 2024
Homeनगरआश्वासनांच्या पुर्ततेसाठी संचालक मंडळ कटीबद्ध - बानकर

आश्वासनांच्या पुर्ततेसाठी संचालक मंडळ कटीबद्ध – बानकर

उंबरे |वार्ताहर| Umbare

सोसायटीच्या निवडणुकीत सभासदांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्यासाठी सर्व संचालक मंडळ कटिबध्द आहे. त्याच विश्वासाने गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेवर सभासदांनी एकहाती सत्ता दिल्याने आजपर्यंत सभासदांच्या हिताचे निर्णय घेता आले. या पुढेही सभासदांना संस्थेच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम केले जाणार असल्याचे आश्वासन संस्थेचे अध्यक्ष सुरेशराव बानकर यांनी दिले.

- Advertisement -

ब्राम्हणी विकास सेवा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानावरून श्री. बानकर बोलत होते. सभा खेळीमेळीत पार पडली. यावेळी विविध विषयावर चर्चा झाली. संस्थेचे मार्गदर्शक बाळकृष्ण बानकर, ज्येष्ठ सभासद विठ्ठल मोकाट, विजयराव बानकर, कृष्णा राजदेव, गणेश हापसे, राम राजदेव, ज्ञानदेव मोकाटे, रावसाहेब गायकवाड, भानुआप्पा मोकाटे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. तर संचालक भागवत देशमुख, माणिक तारडे,महेंदय तांबे, राजेंद्र बानकर यांनी विविध विषय उपस्थित केले. संस्थेचे सचिव यांनी विषयसुचीचे वाचन केले. यावेळी सरपंच प्रकाश बानकर, उपाध्यक्ष अनिल ठुबे, जालिंदर हापसे, भाऊ तारडे, संचालक शिवाजी राजदेव, दादा हापसे, अशोक नगरे, श्रीकृष्ण तेलोरे, डॉ. नंदकुमार बल्लाळ, अरुण बानकर आदी उपस्थित होते.

लाभांश वाटप, झेरॉक्स मशीन खरेदीला परवानगी, शॉपिंग सेंटर बांधकाम अशा विविध विषयवार चर्चा झाली. धनादेशाने रक्कम न काढता ती खात्यावर वर्ग करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

वरोधक व सत्ताधारी यांनी एकमेकांच्या नावाचा उल्लेख आदरपूर्वक व सन्मानपूर्वक करत प्रश्न उपस्थित करत चर्चेत सहभाग नोंदवला. ‘आमचा एकच दिवस असतो, आम्हाला बोलून द्या ना’ असे मिश्किल टिप्पणी विरोधी संचालक राजेंद्र बानकर यांनी केली. ‘त्यासाठी तुम्ही पण बैठकीला वेळेत या, आणि येत जा. पूर्ण वेळ थांबत चला अशी सुचना अध्यक्ष सुरेश बानकर यांनी केली. अशा अनेक विषयावरून एकमेकांनी शाब्दिक टोलेबाजी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या