Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवार रुग्णालयात : तोंडातील अल्सरवर शस्त्रक्रिया

शरद पवार रुग्णालयात : तोंडातील अल्सरवर शस्त्रक्रिया

मुंबई:

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या तोंडातील अल्सरही काढून टाकण्यात आला आहे. त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

- Advertisement -

नवाब मलिक यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. शरद पवार यांच्या पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे रुटीन चेकअप आणि फॉलोअपसाठी पवार ब्रीच कँडी रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांना तोंडाचा अल्सर अाले. हा अल्सर काढून टाकण्यात आला आहे.

१२ एप्रिल रोजी शरद पवार यांच्या पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यापुर्वी ३० मार्चला ब्रीच कॅण्डी रुग्णालयातच शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आजही ट्विट करुन, पवारांच्या प्रकृतीची माहिती दली. “आमचे पक्षाध्यक्ष शरद पवार साहेब काल संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अॅडमिट झाले. त्यांच्यावर गॉल ब्लॅडर शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात दाखल झाले. त्यांची प्रकृती सुधारत आहे”, असे नवाब मलिक म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या