Monday, May 20, 2024
Homeधुळेजातींच्या भिंती तोडून महापुरुषांबाबत बेरजेचे गणित मांडा

जातींच्या भिंती तोडून महापुरुषांबाबत बेरजेचे गणित मांडा

धुळे । dhule । प्रतिनिधी

विश्व संस्कृती निर्माण करावयाची असेल तर ती महापुरुषांच्या विचारांशिवाय होवू शकत नाही. मात्र महापुरुषांना त्यांच्या त्यांच्या जातीच्या भिंती छेदून आपल्याला बेरजेचे गणित मांडावे लागेल तरच हे शक्य आहे. असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ( Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan)माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मांडले. शिक्षकांनी चारित्र्य जपून संस्कारांच्या पायावर शुध्द प्रबोधन करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -

जळगावात दोन अपघातात तीन ठार

धुळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक अकादमीच्या वतीने दुसरे फुले, आंबेडकर विचार राष्ट्रीय शिक्षक संमेलन आजपासून सुरु झाले. संमेलन अध्यक्ष म्हणून डॉ. सबनीस बोलत होते. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा समितीचे सदस्य प्रा. डॉ. केशव देशमुख यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. दोन दिवस चालणार्‍या या संमेलनात डॉ. सबनीस म्हणाले विश्व शांतीसाठी सगळेच प्रयत्न करीत असले तरी ती महापुरुषांच्या विचारांशिवाय अशक्य आहे. जगभरातील महापुरुष एकत्र करण्याचे आणि त्यांच्या विचारांना पुढच्या पिढ्यांपर्यंत मांडण्याचे बेरजेचे काम आपल्याला करावे लागेल. यातच विश्व कल्याण असून या द्वारेच विश्व संस्कृती निर्माण होवू शकते.

मात्र आपण महापुरुषांना जातींच्या चौकटीत आणि अभेद्य भिंतीत अडकवून ठेवत आहोत. जाणीवपुर्वक महापुरुषांबाबत वाद निर्माण केले जात आहेत. मात्र त्या – त्या काळात त्या परिस्थितीनुरुप महापुरुषांनी भूमिका निभावल्यात, निर्णय घेतलेत, समर्थन केले याचा अर्थ एकाच बाजूने विचार करीत त्यांना दोषी ठरवणे योग्य नाही. हे काम शिक्षकांना करावे लागेल. मिळणार्‍या पगाराच्या मोबदल्यात काम करुन स्वत:चे चारित्र्य जपत संस्कारांच्या पायावर शुध्द प्रबोधन करण्याचे काम शिक्षकांना करावे लागेल. यासाठी त्यांनी महापुरुषांमधील लोक शिक्षक डोळ्यासमोर ठेवावे, असेही आवाहन केले.

VISUAL STORY : मानसी अन् प्रदीप मध्ये सुरू झालेय सोशल मीडिया वॉर

उद्घाटन सोहळ्यात प्रा. डॉ. केशव देशमुख, प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. प्रदीप आगलावे (मुंबई), पहिल्या फुले, आंबेडकर विचार संमेलनाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल यांनीही आपापली भूमिका मांडली.

संमेलनानिमित्ताने पहिल्या दिवशी दोन परिसंवाद घेण्यात आले. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय लोकशाही सद्य:स्थिती या विषयावर प्रा. डॉ. श्रावण देवरे, क्रांती वेंदे, डॉ. आनंद अहिरे यांनी मत मांडले. तर दुसर्‍या परिसंवादाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैराचार व लोकशाहीत मानवतावादाची गळचेपी या विषयावर प्रा. डॉ. संजय कांबळे, प्रा. डॉ. रमेश झेड. रणदीवे, प्रा. डॉ. सदाशिव सुर्यवंशी, प्रा. डॉ. अनिल बैसाणे यांनी मनोगत मांडले.

संमेलनाचे संयोजक भास्कर अमृतसागर यांनी प्रास्ताविक केले. तर स्वागताध्यक्ष रवींद्र खैरनार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. शहरातील राजर्षि शाहू महाराज नाट्यमंदिरात प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले सभामंचावर हे कार्यक्रम सुरु आहेत.

VISUAL STORY : या वर्षात कोणकोणत्या सेलिब्रेटींनी बांधली रेशीम गाठ

- Advertisment -

ताज्या बातम्या