Thursday, July 2, 2026
Homeजळगाववडाळीभोईनजीक अपघात; अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद ससाणे यांचा मृत्यू

वडाळीभोईनजीक अपघात; अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद ससाणे यांचा मृत्यू

अमळनेर | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील व चांदवड तालुक्यातील वडाळीभोई नजीक झालेल्या अपघातात अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे यांचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आज दुपारी ते नाशिक येथील आपल्या घरी त्यांच्या चारचाकी वाहनाने परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.

- Advertisement -

पोलीस उपअधीक्षक ससाणे दोन दिवस सुट्टीच्या निमित्ताने घरी परतत होते. याच वेळी सोग्रस पार करून त्यांचे वाहन वडाळीभोईच्या नजीक आले होते. अचानक त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात उलटली. वाहनाचा वेग अधिक असल्यामुळे गाडीचा चेंदामेंदा झाला आहे. तर ससाणे यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला.

ससाणे यांच्या अपघाती मृत्यूमुळे जळगाव ग्रामीण पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघात स्थळावरून
ओळखीच्या व्यक्तीकडून याबाबतची माहिती माने गोक्षेत्र प्रतिष्ठानचे चेतन शाह यांना समजली. पोलीस उपअधीक्षक ससाणे अत्यंत सालस स्वभावाचे होते. त्यांच्या अचानक जाण्यानी सर्वत्र हळहळ व्यक्ती केली जात आहे.

ताज्या बातम्या

गोळीबार

श्रीरामपूरच्या पूर्णवाद नगर परिसरात गोळीबार; तरुण गंभीर जखमी

0
श्रीरामपूर | प्रतिनिधी शहरातील पूर्णवाद नगर परिसरात गुरुवारी सकाळी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील...