Thursday, July 2, 2026
Homeजळगावभुसावळ ते इटारसी दरम्यान रेल्वे वाहतुकीचा खोळंबा ; नागपूर मार्गे गाड्या रवाना

भुसावळ ते इटारसी दरम्यान रेल्वे वाहतुकीचा खोळंबा ; नागपूर मार्गे गाड्या रवाना

श्रमिक, पार्सल व मालगाड्यांचा समावेश

भुसावळ / बर्‍हाणपूर –

- Advertisement -

लॉकडाउनमुळे बंद असलेली रेल्वे वाहतूक काही अंशी सुरु करण्यात आली आहे. त्यात श्रमिक, पार्सल व मालगाड्या चालविण्यात येत आहे. मात्र इटारसी ते भुसावळ मार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे श्रमिकसह अन्य २६ रेल्वे गाड्या या मार्गावर ठिक ठिकाणी थांबविण्यात आल्या आहे.

यामुळे प्रवाशांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रवासी ताटकळले आहे. ही समस्या लक्षात घेतला रेल्वे प्रशासनाने उत्तर भारतात जाणार्‍या या गाड्यांपैकी काही गाड्या भुसावळ-नागपूर मार्गे वळविण्यात आल्या आहे.

भुसावळ विभागातून धावणार्‍या या गाड्या थांबून असल्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांना गर्मी सतावत आहे तसेच पानी व जेवणाची व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहे. यामुळे प्रवाशांची हालत आगीतून उठून ङ्गुङ्गाट्यात पडल्यासारखी झाली आहे.

ताज्या बातम्या

गोळीबार

श्रीरामपूरच्या पूर्णवाद नगर परिसरात गोळीबार; तरुण गंभीर जखमी

0
श्रीरामपूर | प्रतिनिधी शहरातील पूर्णवाद नगर परिसरात गुरुवारी सकाळी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील...