चाळीसगाव | प्रतिनिधी
तालुक्यातील ओढरे शिवारात एका शेतात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मृत झालेल्या बिबट्याचे शव कुजलेल्या अवस्थेत काल सायंकाळी वनविभागाला कर्मचार्याना मिळुन आले.
नर जातीचा हा बिबट्या ९ ते १० महिन्यांचा आहे. घटनास्थळी पंचानामा करुन, आज संकाळी येथील वनविभागच्या कार्यालयात डॉक्टारांनी त्यांचे श्वविच्छेदन केले. त्यानतंर त्यांच्या अत्यंसंस्कार करण्यात आले.
मृत बिबट्याचा मृत्यू कशामुळे याची माहिती प्राप्त होवू शकली नाही. डॉक्टरांनी बिबट्याचा विसराकाडून तो पुढील तपासणीसाठी पाठवीला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहिती नूसार बिबट्याच्या अंगावर कुठल्याही प्रकारच्या जखमा नाहीत. परंतू त्याचा मृत्यू हा तीन ते चार दिवसांपूर्वी झाल्याने, त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे सांगता येणार नाही. पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यानतंरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होवू शकले.
दरम्यान गेल्या वर्षभरात तालुक्यात हा तिसर्या बिबट्या मयत स्थितीत आढळुन आला आहे. यापूर्वी बोढरे, राकडे येथे देखील अशा पद्धतीने मयत स्थितीत दोन बिबट्ये आढळुन आले होते. त्यामुळे यासंपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी वन्यप्रेमीकडून होत आहे. यातील एक बिबट्याची रानडुकारासाठी शिकारीसाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात अडकून मृत्यू झाला होता. या गुन्ह्यातील आरोपींना वनविभागातर्फे अटक करण्यात आली होती.




