Saturday, July 4, 2026
Homeजळगावचाळीसगाव : बालक करोना पॉझिटिव्ह तर तिघे करोनामुक्त

चाळीसगाव : बालक करोना पॉझिटिव्ह तर तिघे करोनामुक्त

चाळीसगाव | प्रतिनिधी

शहरातील कोव्हिड केअर सेन्टरमध्ये काम करणारी नर्स व खाजगी रुग्णालयातील कंपाऊडर अशा दोघांनाही करोना बाधा झाल्याचे संकाळी उघड आहे.

- Advertisement -

आता अवघ्या काही तासातच शहरातील नागदरोड परिसरातील एका १४ वर्षीय बालक करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्याचा तपासणीचा अहवाल दुपारी प्राप्त झाला.

तर समाधानाची बाब म्हणजे शहरातील चौधरीवाडा येथील तीघांनी करोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना आज येथील कोव्हिड केअर सेन्टरमधून घरी सोडण्यात आल्याची माहिती डॉ.डी.के.लांडे यांनी दिली आहे.

शहरातील नागदरोड येथील एक ५६ वर्षीय कोरोना संशयित पुरुषाचा जळगाव येथे मृत्यू झाला होता. त्यांच्या संपर्कात आलेल्या परिवारातील सर्वांचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी जळगाव येथे पाठविण्यात आले होते. त्यांचा तपासणीचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला असून त्यातील एक १४ वर्षीय बालक कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर उर्वरित बाकीच्या अहवाल निगिटिव्ह आले आहेत.

तसेच १५ दिवसांपूर्वी शहरातील एक कंपाऊडर करोना बाधित झाला होता. त्याच्या संपर्कात आलेली आई, पत्नी व मुलगा हे तिघं देखील करोना बाधित झाले होते. परंतू त्यांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केल्याने, आज येथील कोव्हिड केअर सेन्टरमधून त्यांना उत्साहात घरी सोडण्यात आले. याप्रसंगी डॉ.डी.के.लांडे व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.

करोनाग्रस्तांची वाढती संख्या हा शहरवासियांसाठी चिंतेचा विषय असून आता गर्दी टाळा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Kopargaon : सुरेगावात 22 किलो गांजाची झाडे जप्त

0
कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon राज्यात अमली पदार्थांविरोधात (Drugs) पोलिसांकडून सातत्याने विशेष मोहिमा राबविल्या जात असताना तालुक्यातील सुरेगाव गावठाण (Suregaon) येथे कोपरगाव तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या...