Friday, May 3, 2024
Homeजळगावचाळीसगावात करोना संशयित वृध्दाच मृत्यू ; वैद्यकिय यंत्रणा हादरली

चाळीसगावात करोना संशयित वृध्दाच मृत्यू ; वैद्यकिय यंत्रणा हादरली

मयतासह इतराचे स्वॅब तपासणीसाठी

चाळीसगाव | प्रतिनिधी

- Advertisement -

तालुक्यातील डोण येथील कोरोना संशयीत ७० वर्षीय वृध्दाचा आज संकाळी अचनाक मृत्यू झाला आहे. मयत वृद्धाला कालच शहरातील कोव्हीड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात होते. कोव्हीड सेंटरमध्येच या वृध्दाचा मृत्यू झाल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून वैद्यकिय यंत्रणा हादरली आहे.

ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून ग्रामस्थांनाची आता सुरशिता बाळगण्याची अत्यंत गरज आहे. मयत वृध्दाच्या घरी धरणगाव येथून काही दिवसांपूर्वीच त्यांचे भाऊ व भाऊजाई हे वृध्द दाम्पत्य आले होते.

धरणगाव येथून आलेल्या भावाचा परवाच डोण येथे अचानक मृत्यू झाला. मयत भावाला कोरोना सदृश्य लक्षणे असल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याच्या संशयवरुन, खबरदारी म्हणून काल धरणगाव येथून आलेल्या मयताच्या पत्नीसह त्यांच्या भाऊ व इतर अशा पाच ते सहा जणाना डोण येथून खबरदारी म्हणून चाळीसगाव येथे कोव्हींड सेन्टरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते.

परंतू आज संकाळी डोण येथील वृध्दाचा अचानक मृत्यू झाला, त्यामुळे तालुक्यातील वैद्यकिय यंत्रणा हादरली आहे. आता मयतासह क्वारंटाईन असलेल्या पाच ते सहा जणांचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी धुळे येथे पाठविण्यात येणार आहे. तर धरणगाव येथील मयाताच्या पत्नीची प्रकृती देखील खालवत असल्यामुळे तिला जळगाव येथे पाठविण्यात आल्याची माहिती डॉ.बी.पी.बाविस्कर यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या