Friday, October 2, 2026
Homeनगरचेन्नई येथील भक्ताकडून 13 लाख किमतीचा सोन्याचा मुलामा असलेला शंख साई चरणी...

चेन्नई येथील भक्ताकडून 13 लाख किमतीचा सोन्याचा मुलामा असलेला शंख साई चरणी अर्पण

शिर्डी । प्रतिनिधी

शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत माथा टेकवण्यासाठी येतात. बाबांच्या अढळ श्रद्धेपोटी कोणी सोन्या-चांदीचे दागिने तर कोणी रोख रक्कम अर्पण करत असतं. असाच एक अनोखा आणि भक्तीने रसरसलेला नजराणा एका दाक्षिणात्य महिला भक्ताने साईचरणी अर्पण केला आहे.

- Advertisement -

तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथील रहिवासी असलेल्या साईभक्त श्रीमती जी. लक्ष्मी कांता यांनी श्री साईबाबांच्या चरणी तब्बल १०० ग्रॅम वजनाचा आणि अत्यंत आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्याचा मुलामा दिलेला शंख अर्पण केला आहे. या सुवर्ण शंखाची बाजारपेठेतील किंमत १३ लाख २७ हजार ९०० रुपये इतकी आहे.

हा मौल्यवान आणि कलाकुसर केलेला शंख संस्थानकडे सुपूर्द करताना उपस्थित भाविकांचे डोळे दिपले होते. याप्रसंगी शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते दानशूर साईभक्त श्रीमती जी. लक्ष्मी कांता यांचा शाल आणि बाबांची मूर्ती देऊन रीतसर सत्कार करण्यात आला. शिर्डीत या अनोख्या दानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....