जळगाव | प्रतिनिधी
करोना पॉझिटिव्ह बेपत्ता महिलेचा मृतदेह पाच दिवसांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयातील एका शौचालयात सापडल्याप्रकरणी महाविद्यालयाचे अधिष्ठाता, अधीक्षक, पाच प्राध्यापक अशा सात अधिकार्यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी दिली.
भुसावळ येथील ८२ वर्षीय करोना पॉझिटिव्ह महिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह पाच दिवसांनी रुग्णालयातील वॉर्ड क्र.७ मधील शौचालयात बुधवारी आढळला.
- Advertisement -
याप्रकरणी खासदार उन्मेष पाटील यांनी आरोग्य विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी मोबाइलवर चर्चा केली. याप्रकरणी अधिष्ठाता भास्कर खैरे यांच्यासह सात जणांना निलंबीत करण्यात आले आहे, अशी माहिती खासदार पाटील दिली आहे.




