Friday, July 3, 2026
Homeजळगावअमळनेर : तीन दिवस जनता कर्फ्यु स्वयंस्फूर्तीने पाळा – आ.अनिल पाटील

अमळनेर : तीन दिवस जनता कर्फ्यु स्वयंस्फूर्तीने पाळा – आ.अनिल पाटील

पाच दिवस यशस्वी जनता कर्फ्युमुळे कोरोनाची चेन ब्रेक झाल्याचा दावा !

अमळनेर –

- Advertisement -

कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी अमळनेरकरानी दि.7 मे पासून संपूर्ण पाच दिवस घरात थांबून जनता कर्फ्यु 100 टक्के यशस्वी केल्याने कोरोना संपर्काची चेन ब्रेक करण्यात बऱ्यापैकी यश आलेले आहे, मात्र अजूनही ही चेन पूर्णपणे ब्रेक झालेली नसल्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनातील अधिकारी आणि आरोग्य विभागातील अधिकारी व डॉक्टर्स यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार आणि त्यांच्या निरीक्षणानुसार अजून तीन दिवस याच पद्धतीने उद्या दि.12 ते 14 मे पर्यंत जनतेने स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्युस प्रतिसाद द्यावा असे आवाहन आ.अनिल पाटील यांनी केले आहे.

आ.अनिल पाटील यांनी दि.7 मे पासून पाच दिवस जनता कर्फ्युचे आवाहन केल्यानंतर नागरिकांनी यास स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत घरातच थांबणे पसंद केले. यादरम्यान किराणा भाजीपाला व मेडिकल दुकाने देखील बंद राहिल्याने कोणीही रस्त्यावर दिसून आले नाही, यामुळे जनता कर्फ्यु 100 टक्के यशस्ची झाला. या कर्फ्युची मुदत आज 11 मे रोजी संपत असल्याने पुढे अत्यावश्यक सेवा पूर्ववत सुरू होणार का याबाबत नागरिकांत संभ्रम होता.

यासंदर्भात आ.अनिल पाटील यांनी प्राशसन आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी या कर्फ्युचा चेन ब्रेक करण्यात मोठा फायदा झाल्याचे सांगितले मात्र याच पद्धतीने अजून तीन दिवस हा कर्फ्यू पाळला गेल्यास ही चेन पूर्णपणे ब्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केल्याने जनता कर्फ्यु दि.12 पासून पुढे अजून तीन दिवस कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासंदर्भात आ पाटील म्हणाले की पाच दिवस नागरिकांनी जो संयम ठेऊन प्रतिसाद दिला तो कौतुकास्पद आहे. तसाच प्रतिसाद अजून तीन दिवस दिल्यास निश्चितपणे ते आपल्या आणि शहराच्या हिताचे राहणार आहे. त्यासाठी अजून थोडा त्रास सहन करा लवकरच आपल्या भूमीला पूर्वीप्रमाणेच सुगीचे आणि आनंदाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही.हा जनता कर्फ्यु आपल्यावर कुणीही लादत् नसून तो आपण आपल्यासाठीच स्वयंस्फूर्तीने पळणार आहोत.

यादरम्यान अत्यावश्यक सेवा देखील बंदच ठेवाव्या लागतील यासाठी संबंधित व्यावसायिकांनी देखील सहकार्य करावे.,कुणीही पुढील तीन दिवस घराबाहेर न निघता घरातच सुरक्षित राहावे असे आवाहन आ.अनिल पाटील यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

चेन्नई येथील भक्ताकडून 13 लाख किमतीचा सोन्याचा मुलामा असलेला शंख साई...

0
शिर्डी । प्रतिनिधी शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत माथा टेकवण्यासाठी येतात. बाबांच्या अढळ...