Friday, July 3, 2026
Homeजळगावजळगाव : जिल्ह्यात आज १३ कोरोना बाधित रूग्ण आढळले ; रूग्ण संख्या...

जळगाव : जिल्ह्यात आज १३ कोरोना बाधित रूग्ण आढळले ; रूग्ण संख्या झाली ३३१

जळगाव –
जिल्ह्यातील मुक्ताईनगर, कासोदा एरंडोल, जळगाव, चोपडा, भडगाव, पाचोरा, यावल आदि विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 88 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 75 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून तेरा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भडगाव येथील आठ, चोपडा येथील एक, यावल येथील एक तर जळगावातील शिवाजीनगर व इतर परिसरातील तीन रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 331 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 110 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे तर आतापर्यंत 37 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

चेन्नई येथील भक्ताकडून 13 लाख किमतीचा सोन्याचा मुलामा असलेला शंख साई...

0
शिर्डी । प्रतिनिधी शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत माथा टेकवण्यासाठी येतात. बाबांच्या अढळ...