Thursday, July 2, 2026
Homeजळगावजळगाव : एलसीबी पोलीस कर्मचार्‍याला मारहाण; काका-पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : एलसीबी पोलीस कर्मचार्‍याला मारहाण; काका-पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव | प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखेतील हेड कॉन्स्टेबल सुनील पंडित दामोदरे (वय ४९) यांना एका काका व त्यांच्या पुतण्याने मंगळवारी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास मारहाण केली.

या मारहाणीत पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. सुनील दामोदरे हे कार्यालयीन कामकाजानिमित्त मोटारसायकलने एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाण्यासाठी निघाले होते.

- Advertisement -

यावेळी मोठ्या टपाल कार्यालयाजवळील रस्त्याने जात असताना त्यांना मोबाइर्लवर कॉल आला. त्यामुळे मोटारसायकलवरुन उतरुन ते मोबाईलवर बोलत होते. याच वेळी कार (क्र.एमएच १९-६५५५) मधून एक जण उतरला. त्याने पोलीस कर्मचारी दामोदरे यांच्यात वाद घातला.

हिंदी भाषेत बोलत त्याने त्याचे नाव जितू अरुण चांगरे असल्याचे सांगितले. त्याने धक्कबुक्की करुन शिवीगाळ केली. त्याने कारच्या डिक्कीतून लोखंडी पान्हा काढून पोलीस कर्मचार्‍यास मारहाण केली.

जितू चांगरे याने त्याच्या पुतण्याला घटनास्थळी बोलावले. त्याचा पुतण्या घटनास्थळी आला आणि त्याने देखील मारहाण केली. त्यांनी पोलीस कर्मचार्‍याजवळील शासकीय कागदपत्र फेकून दिले.

या घटनेत जखमी झाल्याने सुनील दामोदरे यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. त्यांच्या फिर्यादीवरुन जितू अरुण चांगरे आणि त्याच्या पुतण्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

गोळीबार

श्रीरामपूरच्या पूर्णवाद नगर परिसरात गोळीबार; तरुण गंभीर जखमी

0
श्रीरामपूर | प्रतिनिधी शहरातील पूर्णवाद नगर परिसरात गुरुवारी सकाळी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील...