Friday, July 3, 2026
Homeजळगावजळगाव : कंडारीत दगडाने ठेचून प्रौढाचा खून

जळगाव : कंडारीत दगडाने ठेचून प्रौढाचा खून

जळगाव | प्रतिनिधी

कंडारी (ता.जळगाव) येथील तुषार प्रभाकर सुर्वे (वय ४१) या प्रौढाचा दगडाने ठेचून खळ्यातखून झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

- Advertisement -

रायपूर येथील वसंत सीताराम धनगर आणि कंडारी येथील तुषार प्रभाकर सुर्वे यांनी खळ्यात बुधवारी रात्री मद्यप्राशन केले होते. तुषार सुर्वे हा खळ्यात रखवाली करीत होता. रात्री साडेआठ वाजेपर्यंत सोबत होतो असे वसंत धनगर यांनी पोलिसांना चौकशीत सांगितले आहे. त्यानंतर तुषार सुर्वे यांचा मृतदेह सकाळी खळ्यातील पलंगावर आढळला.

त्याची पत्नी मनीषा सुर्वे यांच्या फिर्यादीवरुन नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तुषार सुर्वे यांच्या पश्चात वडील, भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

ताज्या बातम्या

चेन्नई येथील भक्ताकडून 13 लाख किमतीचा सोन्याचा मुलामा असलेला शंख साई...

0
शिर्डी । प्रतिनिधी शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत माथा टेकवण्यासाठी येतात. बाबांच्या अढळ...