जळगाव –
जिल्ह्यातील करोना बाबतची सद्यस्थिती व त्यावर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी आज दि. ७ रोजी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती –
अजिंठा शासकीय विश्रामगृहात झालेल्या या पत्रकार परिषदेत पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आदि उपस्थित होते.




