शेंदुर्णी ता.जामनेर-वार्ताहर
येथे दोन दिवसांपासून मध्यरात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असून आज पहाटे झालेल्या पावसाने नाले तुडुंब भरून वाहत होते. त्यामुळे नाल्यांचे पाणी नागरी वस्त्यांमध्ये घुसून रस्त्यावरून वाहत होते. तर काही नागरिकांनी रात्र जागून काढली.
येथील सोयगाव रस्त्यावरील जुन्या पाण्याची टाकी परिसरामध्ये नाल्याचे पाणी घुसल्याने घरामध्ये पाणी जाऊन प्रेमदास श्यामदास बैरागी, शंकर रामदास पांचाळ या दोन हात मजुरी करणाऱ्या झोपडीमध्ये पाणी शिरल्याने अन्नधान्यासह घरातील साहित्य पाण्यामध्ये भिजले.
वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने काही घरांवरील पत्रे उडाली तर काही ठिकाणी जुन्या भीतीं मोडल्या आहेत. या सोबत काही भागांमधुन रस्त्यांवरुन पाणी वाहिल्याने कच्या नाल्यांमुळे घरासमोरील भराव वाहुन गेला. रात्र काढली जागुन वादळी वाऱ्यामुळे कच्या घरांमधील नागरीकांनी घरांच्या चिंतेने रात्र जागून काढली.




