Thursday, May 2, 2024
Homeजळगावयावल : अवैध दारू साठा जप्त ; यावल पोलीसांची कारवाई

यावल : अवैध दारू साठा जप्त ; यावल पोलीसांची कारवाई

यावल (प्रतिनिधी)

यावल येथे बुरुज चौकात कलम 144 च्या पार्श्वभूमीवर यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व त्यांचे सहकारी हेडकॉन्स्टेबल युनुस तडवी सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी असलम खान राहुल पांचाळ राजेश महाजन चौकात बंदोबस्त करीत असताना साकळी येथील मोटर सायकल एम एच 19-10=953 या गाडीवर डॅनी नामक इसम तोंडाला रूमाल बांधत जात असताना त्याला पोलिसांनी हटकले त्यात त्याच्या गाडीवर 7 हजार रुपयाची दारू आढळून आली.

- Advertisement -

विदेशी अवैध मेक डॉल, ओ सी, एम बी असे प्रत्येकी अकरा बाटल्या सात हजार रुपये किमतीच्या त्याच्याजवळ आढळल्या पोलिसांनी डॅनी नामक इसमास ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली यामुळे यावल शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे

. शहरात बोरावल गेट पेट्रोल पंप सातोद रस्ता आणि कानाकोपऱ्यात उघड्यावर दारू गावठी पणी विक्री होताना दिसत आहे पोलिसांनी त्यांचाही बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या