Friday, July 3, 2026
Homeजळगावमुक्ताईनगर : ८२ वर्षांच्या आजीने केली करोनावर मात ; संयम ठेवून सकारात्मक...

मुक्ताईनगर : ८२ वर्षांच्या आजीने केली करोनावर मात ; संयम ठेवून सकारात्मक राहण्याचा दिला संदेश

मुक्ताईनगर – प्रतिनिधी

शहरात पाहिल्यांदाच ‘ते’ सात रुग्ण पॉझिटीव्ह निघाले होते. त्यापैकी जिल्हा परिषदचे वरिष्ठ पदाधिकारी आणि त्यांचा मुलगा दोघेही दि.१० जून रोजी करोनावर मात करून घरी परतले.

- Advertisement -

त्यापैकी उर्वरित पाच जणांवर मुक्ताईनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे मुक्ताईनगर हे जळगाव जिल्ह्यासाठी आदर्श ठरत आहे.

यात एका 82 वर्षीय महिलेचाही समावेश आहे. या सर्व रुग्णांची शहरात पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.

वय वर्षे ८२ असलेल्या आजीने आज सर्व करोना रुग्ण आणि भीतीत असणाऱ्या जनतेला सकारात्मक संदेश दिला आहे. त्या म्हणाल्या की, करोनाला घाबरू नका परंतु संयम ठेवा आणि सकारात्मक राहा अशी प्रतिक्रिया त्यांनी घरी पोहचल्यावर दिली.

आयुष्यभर काबाड कष्ट केलेलं असल्याने आणि नेहमी सकारात्मक विचार ठेवल्यामुळेच यावर मी मात करू शकली असे सुद्धा त्या म्हणाल्या. त्याच बरोबर त्यांनी डॉक्टर, आणि त्यांची टीमचे आभार मानले. परीसरातील नागरीकांनी त्यांचे पुष्प उधळू स्वागत केले.

ताज्या बातम्या

गंगापूर

Nashik News: जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यानंतर जुलैत दमदार पावसाची अपेक्ष, गंगापूर...

0
नाशिक । प्रतिनिधीजिल्ह्यातील धरणसाठ्यांत गतवर्षीच्या तुलनेत मोठी तूट निर्माण झाली असून, यात गोदावरी खोऱ्यातील धरणसमूहात गतवर्षाच्या जून अखेरच्या तुलनेत तब्बल २६.६३ टक्के जलसाठ्याची तूट...