Saturday, July 4, 2026
Homeनंदुरबारनंदुरबार : बांड बोलल्याचा रागातून युवकाने केली घरफोडी ; मुद्देमालासह आरोपी ताब्यात

नंदुरबार : बांड बोलल्याचा रागातून युवकाने केली घरफोडी ; मुद्देमालासह आरोपी ताब्यात

नंदुरबार – प्रतिनिधी

नवापूर तालुक्यातील बालाघाट येथे युवकाला बांड (बांड म्हणजे चोर) असे म्हणून हिनावत असल्याचा रागतून बांड काय असतो हे दाखवून देण्यासाठी युवकाने शेजारी राहणार्‍या घरात धाडशी घरफोडी करत एक लाख १९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व १० हजार रुपये रोख लंपास केले होते.

- Advertisement -

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या २४ तासात उलगडा करत मुद्देमालासह युवकाला ताब्यात घेतले आहे. नवापूर तालुक्यातील बालाघाट येथील मलामजी मोत्या गावीत यांची मातीकुडाचे घराची भिंत तोडून स्वयंपाक घरात स्टीलच्या डब्यात ठेवलेले एक लाख १९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व १० हजार रुपये रोख स्टीलच्या डब्यासह अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन नेल्याने विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वेगवेगळे पथक तयार करुन त्यांना योग्य ते मार्गदर्शन व सुचना दिल्या.

अशा प्रकारच्या घरफोडीच्या आरोपीतांची नंदुरबार व शेजारील जिल्ह्यात माहिती काढण्यासाठी एक पथक गुजरात राज्यात रवाना केले.

नवापुर तालुक्यातील पॅरोलवर सुटलेल्या मालमत्तेच्या गुन्ह्यातील आरोपीतांची माहिती घेत होते. पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील फिर्यादी मलामजी मोत्या गावीत यांचे घराजवळ राहणारा अमित व त्यांचेत काही दिवसांपुर्वी वाद कुठल्यातरी कारणावरून वाद झाला होता त्याने ही चोरी केल्याची शक्यता असावी. त्या अनुशंगाने बालाहाट गावातील अमित नावाच्या व्यक्तीचा शोध घेत असतांना फिर्यादी यांचे घराजवळ राहणारा अमित नावाचा मुलगा बालाहाट गावातील सरपाटी नदीच्या किनारी एका काटेरी झुडपाजवळ बसलेला आहे, अशी माहिती मिळाल्याने तात्काळ नदीकिनारी पथक रवाना करुन अमित यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

पुढील तपास विसरवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस हवालदार रविंद्र पाडवी, महेंद्र नगराळे, दादाभाऊ वाघ, पोलीस नाईक, दादाभाई मासुळ, राकेश वसावे, शांतीलाल पाटील, पोशि जितेंद्र तोरवणे, अमित वसावे यांचे पथकाने केली आहे.

ताज्या बातम्या

Kopargaon : सुरेगावात 22 किलो गांजाची झाडे जप्त

0
कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon राज्यात अमली पदार्थांविरोधात (Drugs) पोलिसांकडून सातत्याने विशेष मोहिमा राबविल्या जात असताना तालुक्यातील सुरेगाव गावठाण (Suregaon) येथे कोपरगाव तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या...