Sunday, May 5, 2024
Homeजळगावरावेर दंगलीत एकाचा मृत्यू ; ४८ तांची संचारबंदी लागू

रावेर दंगलीत एकाचा मृत्यू ; ४८ तांची संचारबंदी लागू

रावेर – प्रतिनिधी
येथे काल रात्री शुल्लक कारणावरून दोन गटात झालेल्या दंगलीत एका इसमाचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी त्याच्या घरात तो मृतावस्थेत आढळला.

यशवंत मराठे (वय ४५) रा. संभाजी नगर असे या मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तिक्ष्ण हत्याराचे वार त्याच्या शरीरावर असल्याचे सांगण्यात आले. रावेर पोीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दंगलीच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरातील संचारबंदी ४८ तासांची करण्यात आली आहे.

- Advertisement -

रात्री उशिरापर्यंत शहरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. मयत इसम हा घरी एकटाच होता. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास तो मृतावस्तेत आढळल्याची खबर पोलिसांना मिळाली.

४८ तासांची संचारबंदी

शिवाजी चौकात-मण्यार वाड्यातील जमावाने एकमेकांवर जोरदार दगडफेक करून भडकलेल्या जातीय दंगलीत तीन जण गंभीर जखमी झाले आहे. तर पाच मोटार सायकली, एक मॅजिक यात जाळल्या असून, पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळत नसल्याने हवेत तीन गोळ्या झाडून जमावाला काबूत आणले.

ही घटना रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. प्रार्थना स्थळावरून आलेल्या जमावाने शिवाजी चौकात जोरदार दगडफेक झाल्याने, दोन्ही बाजूने तुफान दगड गोटे एकमेकांवर भिरकवल्याने जोरदार दंगल भडकली. यात संतप्त जमावाने शिवाजी चौकातील व बारी वाड्यातील पाच मोटार सायकली एक टाटा मॅजिक जाळून भक्ष्य केल्या.

येथील दिगंबर अस्वार यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार्थ दाखल केले आहे. ह्या घटनेचे लोण शहरातील संभाजी नगरात पसरले यात निलेश जगताप युवकांच्या डोक्यात रॉड टाकून जखमी केल्याने त्याच्यावर जळगाव येथे खाजगी इस्पितळात उपचार सुरू आहे.

यानंतर जावेद सलीम शेख देखील सिंदखेड रस्त्यावर जखमी मिळून आल्याने नातेवाईक यांनी त्याला जळगाव येथे उपचारार्थ दाखल केले आहे. तो गंभीर जखमी झाला आहे.
यापूर्वी शिवाजी चौकात जमाव प्रक्षोभक असल्याने, पोलिसांना जुमानत नाही अशा स्थितीत सहा.पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक यांनी त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधून तीन गोळ्या झाडून जमावाला पांगवले.

यावेळी जळणाऱ्या वाहनांना रावेर, सावदा अग्निशामक बंबानी आग आटोक्यात आणली, घटनास्थळी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ठाकणे,पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटक्के, प्रांत अधिकारी डॉ.अजित थोरबोले, उपविभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे,पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, मुख्याधिकारी रवींद्र लांडे दाखल झाले होते.

आमदार शिरीष चौधरी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. रात्री १२ वाजता प्रांतअधिकारी यांनी ४८ तासासाठी संचार बंदी घोषित केली आहे. रात्री उशिरा पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.

निंभोरा,सवदा, फैजपूर, आणि मुक्ताईनगर येथील पोलीस कर्मचारी अधिकारी दाखल झाले आहे.शहरात तणाव पूर्ण शांतता असून,मोठ्या प्रमाणात पोलीस कुमुक तैनात केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या