पाल, ता.रावेर – वार्ताहर
येथून दोन की.मी.अंतरावर गारबर्डी येथील आकाराम गोपाळ बारेला या युवकाचा शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात होऊन डोक्यालामार लागल्याने जागेवरच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली.
गारबर्डी येथील अकाराम गोपाळ बारेला (वय २६) मध्यप्रदेशातील बोरवाल येथून परत येत असताना, पाल पासून दोन की अंतरावरील माॅ शेरावाली हॉटेलजवळ एम.एच.१९ डीके ८८४२ वरून ताबा सुटल्याने,रस्त्यालगतअसलेल्या वीट भट्ट्यावर जाऊन पडल्याने झालेल्या अपघात डोक्यावर गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
याघटनेचे वृत्त पोलिसांना मिळताच,पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड, पोलीस कॉ संदीप धनगर हे तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला. मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयात आणून वैद्यकीयअधिकारी डॉ एन डी महाजन यांनी शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात दिला.




