Thursday, June 18, 2026
Homeक्राईमदारूच्या नशेत मारहाण करून मोठ्या भावाचा खून

दारूच्या नशेत मारहाण करून मोठ्या भावाचा खून

सावेडीतील घटना || खुनी लहान भाऊ अटकेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दारूच्या नशेत लहान भावाने मोठ्याला मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना सावेडी उपनगरातील भिंगारदिवे मळ्यात सोमवारी रात्री घडली. स्वप्निल प्रदीप मुळे (वय 32 रा. भिंगारदिवे मळा, सावेडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याचा लहान भाऊ शुभम प्रदीप मुळे (रा. भिंगारदिवे मळा, सावेडी) याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

- Advertisement -

संजय लक्ष्मण सोनवणे (वय 47 रा. भिंगारदिवे मळा, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या भिंगारदिवे मळ्यातील खोलीत स्वप्निल व शुभम हे दोघे राहत होते. त्यांना दोघांंना दारू पिण्याचे व्यसन असल्याने त्यांच्यात नेहमीच वाद होत होते. त्यांच्यात सोमवारी सायंकाळी वाद झाल्याचे फिर्यादीला त्यांच्या मुलाने सांगितले. फिर्यादी यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता स्वप्निल जखमी अवस्थेत असल्याचे दिसून आले.

त्याला फिर्यादीने विचारणा केली असता शुभमने मारहाण केल्याचे त्याने सांगितले. जखमी स्वप्निल याला फिर्यादी व शुभम यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना काल, मंगळवारी पहाटे दोन वाजता त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. पोलीस अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणुकीसाठी राज्यभरात ९९.०२ टक्के मतदान

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai बिनविरोध निवडणुकीमुळे चर्चेत असलेल्या विधान परिषदेच्या राज्यातील ११ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी शांततेत मतदान पार पडले. सकाळी ८ ते सायंकाळी...