Monday, April 6, 2026
Homeदेश विदेशBudget 2026 : अर्थसंकल्प सादर होताच शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांच्या लाखो कोटींचा...

Budget 2026 : अर्थसंकल्प सादर होताच शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांच्या लाखो कोटींचा चुराडा

दिल्ली । Delhi

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर भारतीय शेअर बाजारात आज मोठी खळबळ पाहायला मिळाली. सरकारने ‘ऑप्शन ट्रेडिंग’वर (Option Trading) नवीन कर लागू केल्याच्या वृत्तामुळे गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला, ज्याचा परिणाम म्हणून सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली.

- Advertisement -

अर्थसंकल्पीय भाषण संपताच सेन्सेक्स तब्बल १९०० अंकांनी कोसळून ८०,५०० च्या पातळीवर आला होता, तर निफ्टी ६०० अंकांनी घसरून २४,९०० वर पोहोचला होता. यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. काही काळानंतर बाजार सावरण्याचा प्रयत्न करत असताना, ताज्या आकडेवारीनुसार सेन्सेक्स ८१,२०० च्या आसपास असून तो १००० अंकांनी घसरलेला दिसला. निफ्टीदेखील ३५० अंकांच्या घसरणीसह २४,९५० वर व्यवहार करत होता.

पुणे येथील प्रसिद्ध आर्थिक मार्गदर्शक किरण गांधी यांच्या मते, किरकोळ गुंतवणूकदारांना होणारा मोठा तोटा (जो फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये ९३ टक्क्यांहून अधिक आहे) रोखण्यासाठी सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे. फ्युचर्सवरील ‘एसटीटी’ (STT) ०.०२% वरून वाढवून आता ०.०५% करण्यात आला आहे. तसेच ऑप्शन्स प्रीमियमवर हा कर आता ०.१५% इतका लागू होईल. याशिवाय, कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या ‘शेअर बायबॅक’मधून मिळणारा नफा आता ‘कॅपिटल गेन’ (भांडवली नफा) म्हणून गणला जाणार असून त्यावर कर आकारला जाईल.

ताज्या बातम्या

Shrigonda Crime : केरोसीन विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) जगभरातील युध्दजन्य परिस्थितीमुळे एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होत असताना राज्य शासनाने पर्यायी उपाय म्हणून केरोसीन वितरणाला चालना दिली आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब...