Friday, May 3, 2024
Homeनगरबैल मेहनत आजही खाते आहे भाव

बैल मेहनत आजही खाते आहे भाव

हनुमंतगाव |वार्ताहार| Hanumantgav

सकाळी बैलगाडीत औजारे टाकून घुंगर माळाच्या संगतीत बैलगाडी चालली की आवाजाने मन प्रसन्न होते. सकाळीच उन्हाच्या आधी शेती मेहनतीसाठी जाणार्‍या गाडीवानाला थांबवून शेतकरी आमच्याकडे कधी येणार? चहा घेऊन जा अशी प्रेमळ विनंती करताना दिसतात. यंत्रयुगात बैल मेहनतीला आजही भाव टिकून आहे .

- Advertisement -

इंधन दरवाढीने यंत्रचालक हैराण झाले आहेत. शेतकर्‍यांनाही मेहनतीचे अव्वाचे सव्वा दर वाढल्याने चिंता लागून आहे. यंत्रचालक जास्त क्षेत्र धारकांना पसंती देतात शेतात जाईपर्यंत इंधन लागते. त्या मानाने बैल मेहनतीवाले दर वाढूनही परवडणार्‍या भावात मेहनत करू शकतात. कमी क्षेत्रात मेहनत होते. पिकाची मोडतोड कमी होते. बैलाच्या पायाने व अवजाराच्या फळाने शेतात एक नवचैतन्य येते अशी शेतकर्‍यांची आजही श्रद्धा आहे.

नांगर मेहनत करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. पण आहे त्यांना भरपूर काम आहे. काही बैल मेहनत करणार्‍यांनी मुलांना शिकविणे, घर विकत घेणे अशा गोष्टी करत प्रगती केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पशुधनही टिकून आहे हे देखील महत्त्वाचे आहे चारा, यंत्र, पशुधनाचे वाढते भाव हीदेखील बैल मेहनत धारकांना चिंतेची बाब ठरत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या