Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याVideo जळगावात गोळीबार ; एक जखमी

Video जळगावात गोळीबार ; एक जखमी

जळगाव – Jalgaon

शहरातील कांचन नगर भागात पूर्ववैमनस्यातून चार हल्लेखोरांनी आकाश मुरलीधर सपकाळे या तरुणावर गोळीबार करून जखमी केले. तर हल्ला करण्यासाठी आलेल्या एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

शहरातील कांचन नगरात राहणारा आकाश मुरलीधर सपकाळे हा वडील मुरलीधर नथू सपकाळे आणि भाऊ सागर मुरलीधर सपकाळे यांच्यासह राहतो. गेल्या 5 नोव्हेंबर 2020 मध्ये माजी उपमहापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश अशोक सपकाळे याचा तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केली होती.

त्यामुळे हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचे समजते. आज गुरुवार दि.23 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दोन दुचाकीवर चार हल्लेखोर आले. आकाश सपकाळे हा घरात बेडवर झोपला असताना दोन जण घरात शिरून गोळीबार करण्यास सुरुवात केली, यात आकाशला हाताच्या करंगळीला गोळी लागल्याने जखम झाली. दरम्यान आकाशचा भाऊ सागर हा हल्लेखोराला मागून पकडत झटापट झाली. यात एक हल्लेखोर पायरीवरून खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुद्धावस्थेत पडला. त्यात त्याचे हातातील पिस्तूल व मोबाईल खाली पडलेले होते.

घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तसेच (Upper Superintendent of Police Chandrakant Gawli) अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता (Assistant Superintendent of Police Kumar Chinta) हे घटनास्थळी दाखल झाले आहे. पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या