Thursday, May 2, 2024
Homeनगरदोन सराफ व्यावसायिकांवर हल्ला करून 70 लाख रुपयांचा ऐवज लुटला

दोन सराफ व्यावसायिकांवर हल्ला करून 70 लाख रुपयांचा ऐवज लुटला

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

नगर- सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील दोन सराफ व्यवसायिकांना दुकान बंद करून घरी जात असताना

- Advertisement -

बाबुळगाव जवळ गाडी अडवून कोयत्याने मारहाण करून 70 लाख रुपयांचा ऐवज लुटण्याची खळबळजनक घटना घडली आहे

मिरजगाव येथील राहणारे अतुल पंडित व राहुल पंडित या दोघांचे कर्जत तालुक्यातील माहीजळगाव व चापडगाव या ठिकाणी सराफ दुकाने आहेत. हे दोघे रोज मिरजगाव येथून ये-जा करत असतात. नेहमीप्रमाणे दुकान बंद करून सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हे दोघे भाऊ त्यांची गाडी एमएच 16, ए 4351 या चारचाकी गाडीने सोलापूर नगर महामार्गाने घरी जात असताना कर्जत तालुक्यातील बाबुळगाव या गावाजवळ पाठीमागून तीन दुचाकी गाडीला आडव्या आल्या व त्यांनी दुचाकी आडव्या लावून गाडीकडे पळत आले व काही समजण्याच्या आत या दोन्ही सख्ख्या भावांवर हल्ला केला हल्लेखोरांच्या हातात धारदार शस्त्र होते.

यामध्ये कोयते, सत्तुर याच्या सहाय्याने गाडीच्या काचा फोडल्या तर अतुल व राहुल पंडित यांना मारहाण केली व त्यांच्या जवळ असलेली सव्वा किलो सोने व अडीच किलो चांदी असा सुमारे 70 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळून नेला

दरम्यान, घटनास्थळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक शहाणे व ग्रामस्थांनी काही सराफ व्यवसायिक घटना समजताच घटनास्थळी पोचले व त्यांनी पाठलाग करून एक दुचाकी शेतामध्ये पकडल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळ्या दिशेने चार पथके रवाना केली आहेत. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले वाहन मिरजगाव रोडवर सापडले असून ज्या ठिकाणी वाहन मिळाले त्या परिसरात आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच आरोपी सापडतील, असा विश्वास आहे.

– अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक, कर्जत विभाग.

- Advertisment -

ताज्या बातम्या