Tuesday, October 6, 2026
HomeनगरCrime News : श्रीरामपूर हादरले! बंटी जहागीरदार यांच्यावर भररस्त्यात गोळीबार; शहरात मोठी...

Crime News : श्रीरामपूर हादरले! बंटी जहागीरदार यांच्यावर भररस्त्यात गोळीबार; शहरात मोठी खळबळ

श्रीरामपूर । प्रतिनिधी

श्रीरामपूर शहरात आज दुपारी गोळीबाराची एक थरारक घटना घडली आहे. शहरातील प्रसिद्ध व्यक्ती बंटी जहागीरदार यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, बंटी जहागीरदार हे कब्रस्तानातून आपले काम आटोपून परतत होते. तेथून बाहेर पडल्यानंतर जर्मन हॉस्पिटलसमोरील मुख्य गेटजवळ दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात एकच पळापळ झाली. हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत.

गोळीबारात जखमी झालेल्या बंटी जहागीरदार यांना तातडीने उपचारासाठी कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे सावट पसरले असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जात आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी 369 उमेदवारी अर्ज

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या महिन्याभरापासून गाजत असलेल्या अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार (दि. 5) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 903 अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज...