Wednesday, September 30, 2026
Homeनगरपत्नी बाहेरगावी, पती कामावर जाताच दिवसा फ्लॅट फोडला

पत्नी बाहेरगावी, पती कामावर जाताच दिवसा फ्लॅट फोडला

बालिकाश्रम रस्त्यावर चोरट्यांचा धुमाकूळ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पत्नी बाहेरगावी आणि पती कामावर गेल्यानंतर चोरट्यांनी फ्लॅट फोडून 25 हजाराची ती दिली. बालिकाश्रम रस्त्यावरील बोरूडे मळ्यातील अमृत कलश रेसिडेंसीच्या बी बिल्डींगमध्ये शनिवारी (दि. 25) सकाळी 10 ते दुपारी साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी रखमा बालाजी सुंबे (वय 57) यांनी रविवारी (दि. 26) दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या पत्नी 12 दिवसांपूर्वी गणपतीपुळे येथे गेल्या असून सध्या ते घरी एकटेच आहेत. त्यांच्याकडे सुमारे एक वर्षापासून दिपाली बोठे (रा. बुरूडगाव रस्ता, नगर) या घरातील काम करतात.

- Advertisement -

शनिवारी सकाळी 10 वाजता फिर्यादी त्यांच्या फ्लॅटला कुलूप लावून नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. दुपारी साडेतीन वाजता फिर्यादीला त्यांची पत्नी संगीता यांचा फोन आला व आपल्या घरात चोरी झाल्याचे कामावाल्या महिलेने सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले. फिर्यादी यांनी तात्काळ घरी जाऊन पाहणी केली असता त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. घरातील सामानाची उचकापाचक करून कपाटात ठेवलेली 25 हजारांची रोकड, तीन तोळ्यांची सोन्याची चेन, अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी, अर्धा तोळ्याचे सोन्याचे कानातील झुबे, अर्धा ग्रॅमची सोन्याची बाळी व अर्धा ग्रॅमचे चांदीचे करांडे असा 66 हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले. फिर्यादी यांनी तोफखाना पोलिसांनी माहिती दिली असता पोलिसांचे पथक व डॉगस्कॉड पथक घटनास्थळी येत पाहणी केली असून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.

ताज्या बातम्या

Aaditya Thackeray : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी राजकीय पक्षांकडूनच गुन्हेगारीला खतपाणी;...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai राजकीय पक्षांकडूनच गुन्हेगारीला खतपाणी घातले जात असून प्रदीप पुर्णेकर (Pradeep Purnekar) यांच्या हत्येमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या झाल्याचे पुन्हा...