Thursday, August 27, 2026
Homeक्राईमCrime News : घरफोडीत सोन्या-चांदीचे दागिने लंपास

Crime News : घरफोडीत सोन्या-चांदीचे दागिने लंपास

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील रामवाडी परिसरात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील डब्याचे कुलूप उघडून 70 हजार रूपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रविना किशोर उल्हारे (वय 30, रा. रामवाडी, बालभवन शेजारी) यांनी मंगळवारी (25 ऑगस्ट) फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

फिर्यादीच्या माहितीनुसार, उल्हारे कुटुंबीयांच्या राहत्या ठिकाणी दोन घरे आहेत. दिवसा एका घरात कुटुंबीय राहत असून, शेजारील दुसर्‍या घराला बाहेरून कुलूप लावले जात होते. रात्री झोपण्यासाठी ते दुसर्‍या घरात जात होते. या घरातील कपाटामध्ये कुटुंबीयांचे साहित्य तसेच सोन्या-चांदीचे दागिने ठेवण्यात आले होते. 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास लक्ष्मीआईची जत्रा झाल्यानंतर फिर्यादीने आपल्याकडील सर्व दागिने दुसर्‍या घरातील कपाटामध्ये ठेवलेल्या डब्यात ठेवून त्याला कुलूप लावले होते. या डब्याची चावी त्यांनी जवळच असलेल्या दुसर्‍या डब्यात ठेवली होती.

दरम्यान, 17 ऑगस्ट रोजी सकाळी नऊच्या सुमारास मुलीच्या पासपोर्टसाठी फोटो पाहिजे असल्याने फिर्यादीने कपाट उघडले. त्यावेळी दागिने ठेवलेला डबा उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. डबा तपासला असता त्यातील दागिने गायब असल्याचे आढळून आले. त्यांनी नातेवाईकांकडे चौकशी केली; मात्र दागिन्यांबाबत कोणालाही माहिती नसल्याचे समोर आले.

सोकेवाडीत घरफोडी; चैन लंपास
सोकेवाडी (ता. अहिल्यानगर) येथे घराच्या दरवाजाची आतील कडी तोडून चोरट्याने कपाटातील सुमारे 50 हजार रूपये किमतीची सोन्याची 11 ग्रॅमची चैन चोरून नेली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रूपाली विकास पालवे (वय 26, रा. सोकेवाडी, सध्या रा. दरेवाडी, ता. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. 20 जुलै ते 22 ऑगस्ट दरम्यान ही चोरी झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. 25 ऑगस्ट रोजी फिर्याद दिली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : अखेर भंडारदरा, निळवंडे 100 टक्के भरले!

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेले 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा आणि 8334 दलघफू क्षमतेचे निळवंडे धरण अखेर काठोकाठ भरले असून या दोन्ही धरणांतून...