Tuesday, September 29, 2026
HomeनगरCrime News : दोन घरफोडीत चार लाखांचा ऐवज लंपास

Crime News : दोन घरफोडीत चार लाखांचा ऐवज लंपास

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सावेडी व एमआयडीसी परिसरात घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 3 लाख 94 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यशोदानगर परिसरात चोरट्याने भरदिवसा घराचे कुलूप तोडून सुमारे 24 हजार रूपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेले. सुयोग दत्तात्रय कुरूंद (वय 43) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. कुरूंद दाम्पत्य घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले असता त्यांचे घर फोडून चोरट्यांनी पाच ग्रॅमचे सोन्याचे कानातील फुले व अडीच ग्रॅमचे चांदीचे दागिने असा 24 हजारांचा ऐवज चोरून नेला.

- Advertisement -

दुसरी घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवनागापूर परिसरात घडली. येथे बंद घराचे मुख्य दरवाजाचे कडी-कोंडे तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि सोन्याचे दागिने व 60 हजार रूपयांची रोख रक्कम असा एकूण 3 लाख 70 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी शोभा जयरिंग कवडे (वय 55) यांनी शनिवारी (5 सप्टेंबर) दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजल्यापासून ते 5 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत चोरट्यांनी घर फोडल्याचे समोर आले.

ताज्या बातम्या

‘अँटिलिया’ स्फोटक प्रकरण : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला NIA न्यायालयाकडून...

0
मुंबई । Mumbai अँटिलिया परिसरातील स्फोटकांनी भरलेल्या वाहनामुळे २०२१ मध्ये देशभर चर्चेत आलेल्या प्रकरणाला आता आणखी एक महत्त्वाचे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील आरोपी आणि...