Friday, October 2, 2026
Homeक्राईमCrime News : बंद बंगला फोडून सोन्या चांदीचे दागिने लंपास

Crime News : बंद बंगला फोडून सोन्या चांदीचे दागिने लंपास

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील महाराज हॉटेल पाठीमागील अर्बन बँक कॉलनी परिसरात चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी एका बंद बंगल्याचे कडीकोंडा तोडून आत प्रवेश करत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण 83 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी मकरंद देविदास जामदार यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी जामदार यांचा भिवंडी येथे व्यवसाय असल्याने ते अधूनमधून अहिल्यानगरमधील बंगल्यावर येत असतात. दि. 18 जानेवारी रोजी त्यांचे कुटुंब घराला कुलूप लावून मुंबईला गेले होते.

- Advertisement -

दरम्यान, दि. 23 जानेवारी रोजी सकाळी त्यांच्या माळी कामगाराला घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्याने तातडीने मालकाला फोन करून माहिती दिली. जामदार यांनी तात्काळ शेजार्‍यांशी संपर्क साधला असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी, श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. चोरट्यांनी कपाटातील 1 ग्रॅमची सोन्याची नथ, 4 ग्रॅमच्या तीन अंगठ्या, 3 ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स, 50 ग्रॅमची चांदीची नाणी, 100 ग्रॅमचे पैंजण, चांदीचे जोडवे आणि 60 हजार रुपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला आहे. मकरंद जामदार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार अनिल गोसावी करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....