Sunday, November 15, 2026
HomeनगरCrime News : कुटुंबीय फिरायला जाताच चोरट्यांनी साधली संधी

Crime News : कुटुंबीय फिरायला जाताच चोरट्यांनी साधली संधी

वकिलाचे बंद घर फोडून सोन्याचे दागिने, रोकड लंपास

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

दिवाळीच्या सुटीनिमित्त कुटुंबासह फिरण्यासाठी गेलेल्या वकिलाचे बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे सव्वा तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने, 50 हजार रूपयांची रोकड आणि दुचाकी असा ऐवज चोरून नेला. सावेडी परिसरातील ऐक्यनगर येथे ही घरफोडी झाली. मधुसूदन पांडुरंग गात (वय 63) यांनी याप्रकरणी शनिवारी (14 नोव्हेंबर) तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

मधुसूदन गात हे पत्नी आणि मुलगा यांच्यासह ऐक्यनगर परिसरात राहतात. दिवाळीच्या सुटीनिमित्त गुरूवारी (12 नोव्हेंबर) सकाळी नऊच्या सुमारास ते कुटुंबासह सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथे फिरण्यासाठी गेले होते. बाहेरगावी जाताना त्यांनी घराला व्यवस्थित कुलूप लावले होते. दरम्यान, शुक्रवारी (13 नोव्हेंबर) सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणार्‍या व्यक्तीने फोन करून घराच्या गेटचे आणि मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत अंगणात पडल्याचे सांगितले. तसेच घराच्या आवारात लावलेली दुचाकीही दिसत नसल्याचे कळविले. त्यामुळे घरात चोरी झाल्याचा संशय व्यक्त करून त्यांनी तातडीने अहिल्यानगरला येण्यास सांगितले.

गात यांच्या मुलाने मित्राला फोनवरून घटनेची माहिती दिली. मित्राने पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलीस आणि श्वानपथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. गात कुटुंबीय रात्री साडेआठच्या सुमारास घरी परतल्यानंतर त्यांनी घराची पाहणी केली. यावेळी बेडरूममधील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. घराची तपासणी केली असता अडीच तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, आठ ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे झुबे, 50 हजार रूपयांची रोकड आणि दुचाकी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

ताज्या बातम्या

Crime News : अवैध धंद्यांवर एलसीबीचे 16 ठिकाणी छापे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत एकाच दिवशी जिल्ह्यातील पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत...