Thursday, November 12, 2026
HomeनगरAhilyanagar : फटाके फोडताना 25 वर्षीय तरूणाचा मृत्यू; जिल्ह्यात कुठे घडली घटना?

Ahilyanagar : फटाके फोडताना 25 वर्षीय तरूणाचा मृत्यू; जिल्ह्यात कुठे घडली घटना?

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon

कोपरगाव (Kopargaon) शहरात फटाके फोडत (Bursting Firecrackers) असताना झालेल्या एका दुर्दैवी अपघातात (Accident) 25 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू (Youth Death) झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण साहील विलास आव्हाड (वय 25 रा. बेट, कोपरगाव, जि. अहिल्यानगर) हा 11 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री फटाके फोडत (Bursting Firecrackers) होता. यादरम्यान झालेल्या दुर्घटनेत तो गंभीर जखमी (Injured) झाला. त्यानंतर त्याला तातडीने मोहिनीराज नगर बेट येथून ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू (Death) झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषित केले. ग्रामीण रुग्णालय कोपरगाव यांच्याकडून मेमो प्राप्त झाल्यानंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात (Kopargaon City Police Station) या घटनेची नोंद करण्यात आली.

या प्रकरणी संजय दत्तात्रय आव्हाड (रा. पुणतांबा रोड, आव्हाड वस्ती, कोपरगाव) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार एल. रोकडे हे करीत असून प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Accident : दोन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

0
मालेगाव | प्रतिनिधी Malegaon मुंबई-आग्रा महामार्गावर तसेच मालेगाव-मनमाड रोडवर आज झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये येवला...